आशिया चषक 2022 मधील भारत विरुद्ध पाकिस्तान संघातील महामुकाबला रविवारी (28 ऑगस्ट) रंगणार आहे. दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना होणार आहे. फक्त भारत आणि पाकिस्तानचे क्रिकेट चाहतेच नव्हे तर संपूर्ण जगभरातील चाहत्यांच्या नजरा या सामन्यावर लागून असतील. तत्पूर्वी आजी-माजी दिग्गज या सामन्यासाठी भारताची प्लेइंग इलेव्हन निवडत आहे. याच रांगेत आता भारतीय कसोटीपटू चेतेश्वर पुजारा याचेही नाव जोडले गेले आहे.
पुजाराने (Cheteshwar Pujara) पाकिस्तानविरुद्धच्या (India vs Pakistan) सामन्यासाठी भारताची प्लेइंग इलेव्हन (Cheteshwar Pujara’s Playing Xi) निवडली आहे. मात्र यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) आणि दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) यांच्या निवडीबद्दल आश्चर्यकारक निर्णय घेतला आहे.
पुजाराने ‘ईएसपीएनक्रिकइंफो टी20 टाइमआउट’वर बोलताना भारताची प्लेइंग इलेव्हन निवडली आहे. यावेळी तो म्हणाला आहे की, “पंत आणि कार्तिक या दोघांनाही पाकिस्तानविरुद्ध भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा देणे अशक्य आहे. कारण वरच्या फळीत उपकर्णधार केएल राहुल, कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव आहे. त्यांच्यानंतर मधल्या फळीतील भार सांभाळायला हार्दिक पंड्या आणि रविंद्र जडेजा हे अष्टपैलू आहेत.”
अशात खालच्या फळीत पंत आणि कार्तिक यांच्यापैकी एकालाच जागा उरते. त्यामुळे पुजाराने कार्तिकला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर करण्याचा निर्णय घेतला आहे.
आपल्या या निर्णयाबद्दल बोलताना पुजारा म्हणाला की, “संघ व्यवस्थापनापुढे ही फार मोठी डोकेदुखी असणार आहे. कारण पंत आणि कार्तिक दोघेही टी20 स्वरूपातील दमदार क्रिकेटपटू आहेत. परंतु संघ व्यवस्थापनाला निर्णय घ्यावा लागणार की, पाचव्या क्रमांकावर एक फलंदाज पाहिजे की सहाव्या किंवा सातव्या स्थानावर एक फिनिशर पाहिजे.”
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी चेतेश्वर पुजाराने निवडलेली भारताची प्लेइंग इलेव्हन:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंह, युझवेंद्र चहल
महत्त्वाच्या बातम्या-
खास सामन्याआधी विराटला आल्या आफ्रिकेतून शुभेच्छा! जिगरी यार एबी म्हणतोय…
आठ वर्षांपासून सुरू असलेल्या वर्चस्वाची मालिका टीम इंडिया सुरूच ठेवणार? वाचा ही आकडेवारी
ASIA CUP: भारत-पाकिस्तान सामन्यासाठी मास्टर ब्लास्टर उत्सुक; शेअर केलाय खास फोटो






