भारतीय पुरूष क्रिकेट संघ पुढील महिन्यात बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात दोन कसोटी आणि तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर झाला असून कसोटीच्या संघात चेतेश्वर पुजारा यालाही निवडले आहे. त्याआधी तो भारत ए संघासोबत बांगलादेशला जाणार आहे. यासाठी त्याने तयारी सुरू केली असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
या व्हिडिओमध्ये चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) कवर ड्राईव खेळताना दिसत आहे. त्याने हा व्हिडिओ ट्विट करत कॅप्शनमध्ये लिहिले, बांगलादेशला जाण्यापूर्वी काही अभ्यास
पुजाराने नुकतेच विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा खेळला. त्याला यावर्षी घरच्या मैदानावर खेळण्यात आलेल्या श्रीलंकाविरुद्धच्या कसोटी मालिकेतून वगळले होते. त्याने संघातून बाहेर झाल्यानंतर कठोर मेहनत केली आणि काउंटी क्रिकेटमध्ये जबरदस्त कमगिरी करत संघात पुनरागमन केले.
Some practice before we head to Bangladesh ✈️ pic.twitter.com/doJ8GZ7bWe
— Cheteshwar Pujara (@cheteshwar1) November 25, 2022
ससेक्सकडून खेळताना 34 वर्षीय पुजाराने 8 सामन्यांत 109.40च्या सरासरीने 1094 धावा केल्या. यामध्ये 5 शतकांचा देखील समावेश आहे. काउंटीनंतर त्याला जुलै महिन्यात इंग्लंडविरुद्ध इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या एकमात्र पूर्वनियोजित कसोटी सामन्यासाठी संघात बोलावले.
भारतीय संघ सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. तेथिल तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील शेवटचा सामना 30 नोव्हेंबरला खेळला जाणार आहे. त्यानंतर बांगलादेशच्या दौऱ्यावर तीन सामन्याची वनडे मालिका खेळणार आहे. ज्याचे सामने 4, 7 आणि 10 डिसेंबरला खेळले जाणार आहेत. त्यानंतर 14 ते 18 डिसेंबर दरम्यान पहिली कसोटी खेळली जाणार आहे. दुसरा कसोटी सामना 22 ते 26 डिसेंबर दरम्यान खेळला जाणार आहे. Cheteshwar Pujara practice video before Bangladesh Tour
बांगलादेश दौऱ्यात भारताचा कसोटी संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, आर अश्विन, अक्षर पटेल, रविंद्र जडेजा, केएल राहुल, रिषभ पंत, श्रीकर भरत, कुलदीप यादव, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हॅमिल्टनमध्ये भारतीयांची निराशा होणार? शिखर धवनकडून असतील खूप अपेक्षा
रोहित शर्माच्या विश्रांतीमुळे माजी दिग्गज नाराज, इंग्लंड-ऑस्ट्रेलियासोबत केली तुलना