---Advertisement---

दबाव झेलता न आल्याने आईसमोर बसून रडायचा पुजारा, मग ‘अशी’ केली समस्येवर मात

On: गुरूवार, मे 6, 2021 8:22 AM
---Advertisement---

भारतीय कसोटी संघात भिंत म्हणून ओळख निर्माण करणारा चेतेश्वर पुजारा हा नेहमीच मैदानात शांत आणि संयमी खेळी खेळताना दिसून येत असतो. गोलंदाजाने कितीही आक्रमक गोलंदाजी केली तरीही तो शांत डोक्याने खेळत त्याचा बचाव करत असतो. गेल्या काही वर्षात त्याने भारतीय कसोटी संघासाठी मोलाची भूमिका बजावली आहे. आता त्याने, आपल्या यशामागे कोणाचा हात आहे,याचा खुलासा केला आहे.

पुजाराने अवघ्या ८५ कसोटी सामन्यात ६२४४ धावा केल्या आहेत. तसेच जेव्हा जेव्हा भारतीय संघाला त्याची गरज होती तेव्हा तो मजबूत भिंत म्हणून उभा होता. त्याने एका यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “एक वेळ अशी ही होती जेव्हा मला वाटू लागले होते की, मी दबावाची परिस्थिती झेलू शकत नाही. जेव्हा मी लहान होतो तेव्हा मी मझ्या आई जवळ जाऊन रडायचो. मी तिला म्हणायचो की मी इतक्या दबावात क्रिकेट खेळू शकणार नाही.” वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी आईचे निधन झाल्यानंतर त्याने आपले अध्यात्मिक गुरूंचा सल्ला घ्यायला सुरुवात केली होती. तसेच तो योगा करून आपले लक्ष केंद्रित करत असे.

“देवावर विश्वास ठेवणे माझ्यासाठी सर्वात मोठी गोष्ट”
तसेच तो पुढे म्हणाला की, “मन चांगले असल्याने खूप फरक पडतो. कारण जर तुमचे मन योग्य दिशेने काम करत नसेल तर, तुम्हाला नेहमीच शंका वाटत असते. आयुष्य आनंदी जगायचं असेल तर आपल्या मनापासून आनंदी रहा. कालांतराने मी माझ्या खेळाबरोबरच माझ्या आयुष्यावरही विश्वास ठेवण्यास सुरुवात केली. देवावर विश्वास ठेवणे ही माझ्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट होती.”

आयपीएलच्या संधीबाबत पुजाराने केला खुलासा  
चेतेश्वर पुजाराने कसोटी क्रिकेटमध्ये आपली वेगळीच ओळख निर्माण केली आहे. परंतु त्याला आयपीएल खेळण्याची संधी मिळत नव्हती. त्याने शेवटचा आयपीएल समान २०१४ च्या हंगामात खेळला होता. त्यानंतर त्याने प्रत्येक लिलावात सहभाग घेतला पण कुठल्याही संघाने त्याला आपल्या संघात स्थान दिले नव्हते. आयपीएल २०२१ स्पर्धेत त्याला चेन्नई सुपर किंग्ज संघाने आपल्या संघात स्थान दिले होते. परंतु त्याला पहिल्या ११ खेळाडूंमध्ये खेळण्याची संधी मिळाली नव्हती. याबाबत बोलताना तो म्हणाला की, “तो खूप कठीण काळ होता. आयपीएलमधून बाहेर पडणे आणि कोणी ही आपल्या संघात स्थान न देणे खूप कठीण होते. यामुळे मलाही धक्का बसला. पण नंतर मला कळाले की गोष्टी माझ्या नियंत्रणाखाली नाही आहेत. अशा परिस्थितीत मी छोट्या स्वरूपात चांगले करण्याचा प्रयत्न करू लागलो.”

महत्त्वाच्या बातम्या –

या ३ प्रमुख कारणांमुळे आयपीएल संघांच्या बायोबबलमध्ये झाला कोरोना व्हायरसचा शिरकाव?

‘या क्षणाला भारत आणि आयपीएल दोन वेगवेगळे जग आहेत’

‘कोरोना हा आता विनोदाचा भाग राहिलेला नाही’, चेन्नई सुपर किंग्सच्या खेळाडूची प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---