---Advertisement---

आयपीएल पुनरागमनाने पुजाराच्या पंखात भरलं बळ; हंगाम संपताच खेळणार ही परदेशी टुर्नामेंट

On: रविवार, फेब्रुवारी 21, 2021 6:16 PM
---Advertisement---

भारतीय कसोटी संघाची ‘ भिंत ‘ समजल्या जाणाऱ्या चेतेश्वर पुजारा याला ७ वर्षांनंतर आयपीएल खेळण्याची संधी मिळणार आहे. चेन्नईमध्ये पार पडलेल्या आयपीएल २०२१ च्या लिलावात चेतेश्वर पुजाराने देखील सहभाग घेतला होता. गेल्या काही वर्षांपासून अन्सोल्ड होत असलेल्या पुजाराला चेन्नई सुपर किंग्स संघाने ५० लाखांची बोली लावत आपल्या संघात समाविष्ट केले आहे. अशातच इंग्लंड दौऱ्यापूर्वी चेतेश्वर पुजाराने काउंटी क्रिकेट खेळण्याबाबत वक्तव्य केले आहे.

येत्या एप्रिल महिन्यात आयपीएल स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. चेतेश्वर पुजारा हा चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळतांना दिसेल.तसेच ऑगस्ट महिन्यात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर कसोटी मालिका खेळणार आहे. अशातच सराव म्हणून काही दिवसांपूर्वी चेतेश्वर पुजाराने काउंटी क्रिकेट खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. तो वारविकशायर संघातून खेळणार असल्याचे म्हटले जात होते. परंतु आता आयपीएल स्पर्धेत निवड झाल्यामुळे तो काउंटी क्रिकेट खेळण्यासाठी जाणार की नाही हा प्रश्न उपस्थित झाला होता. याच्यावर पुजाराने म्हटले आहे की, आयपीएल मुळे काउंटी क्रिकेटवर काहीच फरक पडू देणार नाही.

चेन्नई सुपर किंग्स संघाचे मानले आभार

सात वर्षांनंतर आयपीएलमध्ये पुनरागमन करण्याबद्दल चेतेश्वर पुजाराने म्हटले की, “सर्वात आधी मी आयपीएल स्पर्धेचा भाग असल्यामुळे आनंदी आहे. पुनरागमन होत असल्यामुळे देखील आनंद होत आहे. मला संघात स्थान दिल्यामुळे मी चेन्नई सुपर किंग्स संघाचे आभार मानतो आणि काउंटी क्रिकेट बद्दल बोलत असाल तर मी या स्पर्धेत भाग घेईल. इंग्लंडमध्ये खेळण्यापुर्वी माझ्याकडे काउंटी खेळण्यासाठी वेळ असेल.माझ्याकडे काउंटी खेळण्यासाठी वेगळा कालावधी असेल. आयपीएल संपल्यानंतर मी याबाबत निर्णय घेईल. कसोटी मालिकेच्या सुरुवातीपूर्वी आम्हाला इंग्लंड संघाविरुद्ध सराव सामने देखील खेळायचे आहेत.”

७ वर्षांनंतर आयपीएल खेळण्याची संधी

गेल्या काही वर्षांपासून आयपीएल लिलावात सहभाग घेत असलेल्या चेतेश्वर पुजाराला ७ वर्षांनंतर आयपीएल खेळण्याची संधी मिळणार आहे. त्याने २०१४ साली शेवटची आयपीएल स्पर्धा खेळली होती.या स्पर्धेत त्याला साजेशी कामगिरी करण्यास अपयश आले. तो आतापर्यंत केकेआर, आरसीबी आणि किंग्स इलेवन पंजाब संघासाठी आयपीएल खेळला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

चहलची पत्नी धनश्री रंगली क्रिकेटच्या रंगात; डान्स करतानाचा व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल

आयपीएल लिलावाच्या इतिहासात खर्च झालेली रक्कम ऐकून चक्रावून जाल; प्रत्येक देशांना मिळालाय इतका वाटा

भारतात कोहली तर पाकिस्तानमध्ये आझमचा डंका; टी२० लीगच्या ‘या’ मोठ्या विक्रमात दोघेही अव्वल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---