भारतीय संघाला पुढच्या महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जायचे आहे. इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाला तीन सामन्यांची एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळायची आहे. त्याव्यतिरिक्त मागच्या वर्षी इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिकेचा एक सामना खेळायचा बाकी राहिला होता, जो आता खेळला जाणार आहे. अनुभवी कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजाराला या कसोटी सामन्यात संधी मिळण्याची शक्यता आहे, पण अजिंक्य रहाणे मात्र या दौऱ्यात सहभागी होऊ शकणार नाही.
रहाणे आणि पुजारा या दोन्ही दिग्गजांना काही दिवसांपूर्वी भारताच्या कसोटी संघातून वगळले गेले होते. सततच्या खराब प्रदर्शनानंतर निवडकर्त्यांनी त्यांना मार्च महिन्यात खेळल्या गेलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत संधी दिली नव्हती. अशात इंग्लंडविरुद्धच्या माकिकेसाठी रहाणे आणि पुजारा जोडी त्यांचा अनुभवाच्या जोरावर पुन्हा एकदा एकत्र खेळताना दिसेल, अशी अनेकांची अपेक्षा होती. परंतु, परिस्थिती अशी आहे की, आगामी काळात पुजारा संघात पुनरागमन करू शकतो, पण रहाणेसाठी हे सोपे दिसत नाहीये.
इंग्लंड दौऱ्यावेळी अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) विश्रांतीवर असणार आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या आयपीएल सामन्यात रहाणेच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याचे पाहिले गेले होते. तो सध्या तिसऱ्या ग्रेडच्या हॅमस्ट्रिंग दुखापतीशी झगडत असल्याची माहिती मिळाली आहे. अशात त्याला कमीत कमी चार आठवड्यांच्या विश्रांतीची गरज आहे. बेंगलोरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत त्याला दुखापतीवर काम करावे लागणार आहे.
दुसरीकडे, चेतेश्वर पुजार (Cheteshwar Pujara) याचा विचार केला, तर इंग्लंड दौऱ्यात त्याला संधी मिळणे जवळपास निश्चित आहे. त्याने काउंटी क्रिकेटमध्ये जबरदस्त प्रदर्शन करून स्वतःची गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. त्याने काउंटी चॅम्पियनशिप डिविजन दोनमध्ये खेळलेल्या पाच सामन्यांतील आठ डावांमध्ये दोन द्विशतके आणि दोन शतके ठोकली आहेत. यादरम्यान त्याने १२०.०० च्या सरासरीने ७२० धावा केल्या आहेत. त्याचा हाच फॉर्म पाहून निवडकर्ते त्याला पुनरागमनाची संधी देतील, अशी पूर्ण शक्यता आहे.
भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी १६ जून रोजी रवाना होणार आहे. त्याआधी भारतीय संघाला मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिका खेळायची आहे, तसेच आयर्लंडविरुद्ध दोन सामन्यांची टी-२० मालिका देखील खेळायची आहे. निवडकर्ते इंग्लंड दौऱ्यासाठी आणि आयर्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी वेगवेगळे संघ निवडतील, अशी शक्यता आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
मराठी माणसाला अभिमान वाटेल असा आहे वानखेडे स्टेडियम बनण्याचा इतिहास
‘कठीण परिस्थितीत प्रदर्शन करायला…’, पंजाबविरुद्धचा ‘मॅन ऑफ द मॅच’ शार्दुल ठाकूरची खास प्रतिक्रिया
वॉर्नरला स्वत:चीच चतुराई भोवली? पहिल्याच चेंडू खेळताना असा झाला ‘गोल्डन डक’