सध्या इराणी ट्रॉफीमध्ये सौराष्ट्र आणि रेस्ट ऑफ इंडिया यांच्यातील टी-20 सामना खेळला जात आहे. काउंटी क्रिकेटमध्ये धावांचा डोंगर उभा करणाऱ्या चेतेश्वर पुजारा याच्याकडून सर्वांना चांगल्या फलंदाजीची अपेक्षा होती. परंतु त्याने चाहत्यांची खूपच निराशा केली आहे. राजकोटमध्ये खेळल्या जाणाऱ्या सौराष्ट्र विरुद्ध रेस्ट ऑफ इंडिया यांच्यातील या सामन्यात पुजाराने सलग दुसऱ्यांदाच स्वस्तात विकेट मागवली आहे.
रेस्ट ऑफ इंडिया संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या सौराष्ट्र संघ अवघ्या 98 धावांवर गुंडाळला गेला होता. या धावा त्यांना 24.5 षटकात केल्या. प्रत्युत्तरात रेस्ट ऑफ इंडिया संघाने पहिल्या डावात 110 षटकांमध्ये 374 धावा केल्या. यानंतर सौराष्ट्र संघ तब्बल 276 धावांनी मागे पडला होता. दुसऱ्या डावात देखील सौराष्ट्रची वरची फळी स्वस्तात बाद झाली होती, परंतु खालच्या मध्यक्रमातील फलंदाजांनी संयमी खेळ दाखवत संघाला समाधानकारक धावसंख्येपर्यंत पोहोचवले. असे असले तरी चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) मात्र चाहत्यांच्या अपेक्षांवर खरा उतरला नाही.
पुजारा सामन्याच्या पहिल्या डावात 4 चेंडू खेळला आणि 1 धाव करून बाद झाला. त्यानंतर दुसऱ्या डावात त्याने एकूण 9 चेंडू खेळले आणि पुन्हा एकदा 1 धाव करून विकेट गमावली. विशेष म्हणजे पुजाराला दोन्ही वेळी कुलदीप सेनने बाद केले आहे. तत्पूर्वी इंग्लंडमध्ये काउंटी चॅम्पियनशिप ससेक्स संघासाठी खेळताना त्याने धावांचा कहर केला होता, पण भारतात परतल्यानंतर तो पुन्हा एकदा धावा करण्यासाठी झगडत असल्याचे पाहायला मिळाले. दुसर्या डावात सौराष्ट्रसाठी खालच्या मध्यक्रमातील फलंदाजांनी चांगले प्रदर्शन केल्यामुळे संघ अफेक्षित धावसंख्या गाढू शकला. शेल्डन जॅक्सन 71, अर्पित वासवदा 55, प्रेरक मांकड 72 आणि जयदेव उनादकडने 78 धावांचे योगदान दिले.
दरम्यान, सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर दुसरीकडे पहिल्या डावात रेस्ट ऑफ इंडियासाठी मुकेश कुमार याने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. त्याने 10 षटकांमध्ये 23 धावा खर्च करून ही कामगिरी केली. कुलदीप सेन आणि उमरान मलिक यांनीही प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेत पहिल्या डावात सौराष्ट्रला स्वस्तात गुंडाळले. दुसऱ्या डावात सौराष्ट्रसाठी कुलदीप सेन आणि सौरभ कुमार यांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत सौराष्ट्रने 8 विकेट्सच्या नुकसानावर 368 धावा केल्या आहेत. अजून दोन दिवसांचा खेळ बाकी असून चाहते पुढचा खेळ पाहण्यासाठी उत्सुकत आहेत. सध्या तरी पारडे काही प्रमाणात रेस्ट ऑफ इंडियाच्या बाजूने झुकलेले दिसते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
INDvSA: इंदोरच्या टी20मध्ये विराट-राहुलची रिप्लेसमेंट कोण? ‘या’ खेळाडूंना संधी
फिफा अंडर17 वुमन्स वर्ल्ड कप इंडिया 2022 स्पर्धेमुळे उदयोन्मुख खेळाडूंमध्ये जागरूकता – बायचुंग भुतिया






