भारतीय संघाचा पूर्ण लक्ष सध्या मायदेशात होणाऱ्या आयसीसी वनडे विश्वचषकावर आहे. राहुल द्रविड संघाचे मुख्य प्रशिक्षव बनल्यानंतर भारतीय संघाने महत्वाच्या मालिका जिंकल्या आहेत, पण आयसीसी स्पर्धां आणि आशिया चषकात संघाला अपयश स्वीकारावे लागले. आगामी विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर संघाला वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये वेगवेगळे कर्णधार नियुक्त केले जाणार असल्याचेही अनेकदा सांगितले जात. याविषयी बोलताना राहुल द्रविड यांनी दिलेले उत्तर असे होते, जै ऐकून चाहते हैराण आहेत.
भारतीय संघाने मागच्या वर्षी आशिया चषक (Asia Cup 2022) आणि टी-20 विश्वचषक (T20 World Cup 2022) खेळला, पण संघाला या प्रमुख स्पर्धांमध्ये अपेक्षित कामगिरी करता आली नाही. पण आगामी वनडे विश्वचषकात संघ विजेतेपद मिळवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करेल. तत्पूर्वी संघ सद्या न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिका खेळत आहे. वनडे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारताने पाहुण्या न्यूझीलंडला धूळ चारली. उभय संघांतील तिसरा आणि शेवडचा वनडे सामना मंगळवारी (24 जानेवारी) इंदोरच्या होळकर स्टेडियवर खेळला जाणार आहे.
रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वातील भारतीय संघ या सामन्यात न्यूझीलंडला क्लीन स्वीप देखील देऊ शकतो. पहिल्या दोन सामन्यांतील भारताचे प्रदर्शन पाहता न्यूझीलंडसाठी तिसऱ्या सामन्यात विजय मिळवणे देखील कठीण दिसत आहे. तिसऱ्या सामन्याआधी राहुल द्रविड (Rahul Dravid) माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना पत्रकारांकडून संघाच्या कर्णधारपदाविषयी प्रश्न विचारला गेला. वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये वेगवेगळे कर्णधारपदाविषयी राहुल बोऊ इच्छित नसल्याचे त्याच्या उत्तरावरून जाणवले. “मला अशा गोणत्याच गोष्टीविषयी काहीच महीत नाहीये. हा असा प्रश्न आहे, जो तुम्ही निवडकर्त्यांना विचारला पाहिजे. सध्यातरी मला वाटत नाही की, असे काही होणार आहे.” द्रविडने यावेळी इतरही काही महत्वाच्या मुद्यांवर भाष्य केले.
💬 💬 We have to prioritise certain formats at various stages: #TeamIndia Head Coach Rahul Dravid #INDvNZ pic.twitter.com/0pmJ4KEAJQ
— BCCI (@BCCI) January 23, 2023
दरम्यान, मागच्या काही महिन्यांपासून हार्दिक पंड्या (hardik Pandya) आगामी काळात भारताच्या टी-20 संघाचा कर्णधार बनणार असल्याचे बोलले जात आहे. माध्यमांमध्ये अशीही माहिती समोर आली होती की, रोहित शर्मा आणि विराट कोहली (Virat Kohli) अशा वरिष्ठ खेळाडूंना बोर्ड आता टी-20 फॉरमॅटमध्ये विश्रांती देण्याच्या विचारात आहे. असे असले तरी, अद्याप याविषयी खुठली ठोस माहिती समोर येऊ शकली नाहीये. (Chief coach Rahul Dravid got angry on the journalist’s question)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वैदिक पद्धतीने बांधली राहुल-आथियाने सात जन्माची गाठ; नवदांपत्याचे फोटोज् आले समोर
पोरी एक पाऊल पुढे! 2022 आयसीसी टी20 संघात स्मृतीसह तब्बल चार भारतीय