शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बालेवाडी (जि.पुणे) याठिकाणी प्रदान करण्यात आले. यावेळी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडा मंत्री संजय बनसोडे आणि ग्राम विकास मंत्री गिरीष महाजन उपस्थिती होते.
“भारत २०३६ चे यजमानपद भूषविण्याच्यादृष्टीने पूर्वतयारी करत असून राज्यानेही प्रत्येक क्रीडा प्रकारातील आपली बलस्थाने आणि कमकुवत दुवे ओळखून या ऑलिम्पिक स्पर्धेच्या पूर्वतयारीचा ‘रोडमॅप’ तयार करावा,” असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.
ऑलिम्पिक पदक विजेते कुस्तीपटू स्व.खाशाबा जाधव यांचा १५ जानेवारी हा जन्म दिवस राज्य क्रीडा दिन म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केला. तर, शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार विजेत्या खेळाडूंना पाच लाख रुपये, अन्य पुरस्कार विजेत्यांना तीन लाख रुपये देण्याची घोषणाही त्यांनी केली.
“महाराष्ट्र खेळाला प्रोत्साहन देणारे देशातील अग्रेसर राज्य आहे. त्यामुळे खेळात महाराष्ट्राने घवघवीत यश मिळवले आहे. ऑलिम्पिकमध्येही चांगले यश मिळावे यासाठी सर्व सहकार्य करू. खेळाडूंनी राज्याचा लौकिक आंतरराष्ट्रीय पातळीवर असाच उंचवावा,” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
“क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन अग्रेसर आहे. यावर्षी देण्यात आलेल्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. यासाठी लागणाऱ्या २ कोटी ३८ लाख रुपयांच्या रकमेस मान्यता देण्यात येईल,” असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. (Chief Minister’s big announcement! State Sports Day will be celebrated on Khashaba Jadhav’s birth anniversary)
महत्वाच्या बातम्या –
राहुलच्या अनुपस्थितीत संजू सॅमसनला संधी मिळणार, आशिया चषकात काय निर्णया घेणार संघ व्यवस्थापन?
याला म्हणतात क्रेझ! सरावानंतर ‘किंग’ कोहलीला दिसताच चाहत्यांनी केला ‘विराट-विराट’चा जयघोष, Video