भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याची बॅट गेल्या काही वर्षांपासून शांत आहे. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतही विराट फलंदाजीत संघर्ष करताना दिसला होता. सारख्याच पद्धतीने चेंडूला क्रॉसमध्ये खेळण्याच्या प्रयत्नात विराट पायचित होताना दिसला आहे. त्याला या संपूर्ण मालिकेदरम्यान साधे अर्धशतकही करता आलेले नाही. महान फलंदाजांमध्ये गणना होणाऱ्या विराटला संघर्ष करताना पाहून त्याचे बालपणीचे प्रशिक्षक (Virat Kohli’s Childhood Coach) राजकुमार शर्मा (Rajkumar Sharma) यांनी त्याला कामाचा सल्ला दिला आहे. त्यांनी विराटला पुन्हा अकादमीत सहभागी होण्यास सांगितले आहे, जिथे तो त्याच्या समस्येला सोडवू शकेल.
खेलनीति या यूट्यूब चॅनलशी बोलताना राजकुमार म्हणाले की, “विराटला पुन्हा त्याच्या बेसिक्सवर काम करावे लागणार आहे. माझी इच्छा आहे की, त्याने अकादमीत परत यावे. मी कालपासून याबद्दल विचार करत आहे. मला याबाबत त्याच्याशी बोलायचे आहे. तो यापूर्वी जेव्हा अकादमीत फलंदाजी करत असायचा, तेव्हा त्याच्या फलंदाजीत ज्या प्रकारचा आत्मविश्वास दिसायचा, तशा आत्मविश्वासाची त्याला आता गरज आहे.”
विराट खूपच सांभाळून फलंदाजी करतोय
विराटचे श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील प्रदर्शन अतिशय निराशाजनक राहिले आहे. हे कसोटी सामने भारतातील मैदानांवर झाले असूनही विराटला चांगली फलंदाजी करता आली नाही. त्याने या मालिकेतील २ सामन्यांमध्ये २७ च्या सरासरीने केवळ ८१ धावा केल्या आहेत.
याबद्दल बोलताना राजकुमार म्हणाले की, “विराट खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी करत आहे. परंतु शोकांतिका ही आहे की तो जास्तच सांभाळून खेळण्याचा प्रयत्न करत आहे. त्याने मोकळेपणाने फटके खेळायला पाहिजेत. अकादमीत फलंदाजी करताना त्याच्यामध्ये जो आत्मविश्वास असायचा, तो आता त्याला परत पाहिजे.”
हेही वाचा- श्रीलंकन कर्णधाराने शतक झळकावताच विराटने खास अंदाजात केला सलाम; व्हिडिओ पाहून तुम्हीही कराल कौतुक
३ वर्षांपासून विराटच्या बॅटमधून निघाले नाही शतक
विराटने त्याचे शेवटचे आंतरराष्ट्रीय शतक नोव्हेंबर २०१९ मध्ये केले होते. तेव्हा त्याने कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर बांग्लादेशविरुद्धच्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात १३६ धावांची शानदार खेळी खेळली होती. हा भारतीय संघाचा पहिलाच दिवस-रात्र कसोटी सामना होता आणि भारतीय संघाने हा ऐतिहासिक सामना १ डाव व ४६ धावांनी जिंकला होता. या सामन्यानंतर मात्र विराटच्या बॅटमधून एकही आंतरराष्ट्रीय शतक निघालेले नाही.
विराटच्या त्याच्या ७० शतकांसह सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके करण्याच्या विक्रमात तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे. या विक्रमात सचिन तेंडूलकर अव्वलस्थानी आहे, ज्याच्या नावे सर्वाधिक १०० शतके आहेत. तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग ७१ शतकांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
झुलन गोस्वामीने गाठले कपिल देव, क्रिकेटमधील ‘ही’ असाध्य कामगिरी करण्यात महान अष्टपैलूची केली बरोबरी
दोन वर्षांच्या अंतरात एकाच दिवशी कसोटीत झालेले संथ अन् जलद द्विशतक, जाणून घ्या त्या सामन्यांबद्दल
‘एमएस धोनीपेक्षा सरस बनू शकतो रिषभ पंत’, माजी भारतीय सलामीवीराचा विश्वास