भारतातील लोकसभा निवडणूका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे देशभरात अनेक राजकीय घडामोडी घडत आहे. याचा प्रत्यय सध्या भारतात सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेतील एका सामन्यादरम्यानही आला आहे.
सोमवारी राजस्थान रॉयल्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब संघात झालेल्या सामन्यात एक वेगळीच गोष्ट पहायला मिळाली. क्रिकेट चाहते नेहमीच मैदानावर खेळाडूंच्या नावाची गर्जना करत प्रोत्साहन देत असताना पहायला मिळतात.
पण या सामन्यात काही प्रेक्षकांनी भारतीय जनता पक्षाविरुद्ध घोषणाबाजी केली आहे. त्यांनी ‘चाैकीदार चोर है’ ही घोषणा दिली आहे. याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रेक्षकांनी त्यांच्या टी-शर्टवर ‘चाैकीदार चोर है’ या वाक्याची इंग्रजी अक्षरे पेंट केली होती. हे सर्व एकसाथ उभे राहिले आणि त्यांनी घोषणाबाजी केली.
यावेळी पंजाबचा संघ फलंदाजी करत होता आणि त्यांच्या डावातील 19 वे षटक चालू होते. या सामन्यात पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 4 बाद 184 धावा केल्या होत्या. तर त्यांच्या प्रतिउत्तरादाखल राजस्थानला 9 बाद 170 धावाच करता आल्या. त्यामुळे पंजाबने 14 धावांनी विजय मिळवला.
https://twitter.com/RajaBrar_INC/status/1110388183827546112
काय आहे ‘चाैकीदार चोर है’
भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे स्वत:ला देशाचे चौकीदार असे म्हणतात. त्यामुळे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींवर टिका करण्यासाठी ‘चौकीदार चोर है’ असे म्हटले आहे. तेव्हापासून ‘चौकीदार चोर है’ हे वाक्य प्रसिद्ध झाले आहे. तसेच भाजपाच्या अनेक नेत्यांनी त्यांच्या सोशल मीडिया आकाउंटवर त्यांच्या नावाआधी चौकिदार असे लिहीले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
–युवराज सिंगच्या एक पाऊल पुढे निघाला हा मुलगा, ठोकले ७ चेंडूत ७ षटकार..
–प्रो कबड्डी सीजन ७ लिलावात या टाॅप ५ खेळाडूंवर असतील जास्त नजरा !






