पोर्ट ऑफ स्पेन। वेस्ट इंडीजचा आक्रमक सलामीवीर फलंदाज ख्रिस गेलने रविवारी(11 ऑगस्ट) भारताविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात खेळताना वेस्ट इंडीजकडून सर्वाधिक वनडे धावा करण्याचा विश्वविक्रम केला आहे.
या सामन्यात गेल 11 धावांवर भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यामुळे त्याच्या वेस्ट इंडीजकडून 297 वनडे सामन्यात 10353 धावा झाल्या आहेत.
वेस्ट इंडीजकडून सर्वाधिक वनडे धावा करण्याचा विश्वविक्रम करताना गेलने वेस्ट इंडीजचे माजी दिग्गज क्रिकेटपटू ब्रायन लारांना मागे टाकले आहे. लारा यांनी त्यांच्या वनडे कारकिर्दीत वेस्ट इंडीजकडून खेळताना 295 सामन्यात 10348 धावा केल्या आहेत.
गेल 300 वनडे खेळणारा वेस्ट इंडीजचा पहिलाच क्रिकेटपटू –
गेलचा वनडे कारकिर्दीतील हा 300 वा वनडे सामना होता. त्याने या 300 वनडे सामन्यांपैकी 3 सामने आयसीसी एकदाश संघाकडून खेळले आहेत. तर 297 सामने वेस्ट इंडीजकडून खेळले आहेत.
गेल कारकिर्दीत 300 वनडे सामने खेळणारा वेस्ट इंडीजचा पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे. त्याने हा पराक्रम करतानाही लारांना मागे टाकले आहे. लारा यांनी त्यांच्या कारकिर्दीत 299 वनडे सामने खेळले आहेत. यातील 4 वनडे त्यांनी आयसीसी एकादश संघाकडून खेळले आहेत आणि 295 वनडे वेस्ट इंडीजकडून खेळले आहेत.
रविवारी झालेल्या या वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघातील दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने डकवर्थ लूईस नियमानुसार 59 धावांनी विजय मिळवला.
#वेस्ट इंडीजकडून वनडेत सर्वाधिक धावा करणारे क्रिकेटपटू –
10353 धावा – ख्रिस गेल (297 सामने)
10348 धावा – ब्रायन लारा (295 सामने)
8778 धावा – शिवनारायण चंद्रपॉल (286 सामने)
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–विराट कोहली हा मोठा पराक्रम करत रोहित शर्माला ठरला सरस!
–किंग कोहलीने गांगुलीच्या या ‘दादा’ विक्रमाला टाकले मागे
–गांगुली-तेंडुलकरनंतर विराट-रोहितची जोडीच ठरली बेस्ट!