वेस्ट इंडिज संघाचा विस्फोटक फलंदाज आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‘युनिव्हर्सल बॉस’ म्हणून ओळखला जाणारा ख्रिस गेल हा नेहमीच आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करत असतो. मैदानात तो जितका आक्रमक आहे, तितक्याच उलट तो मैदानाबाहेर मजेशीर स्वभावाचा आहे. आज (२६ एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध पंजाब किंग्ज संघाचा सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी त्याचा एक डान्स करत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
पंजाब संघाने आयपीएल २०२१ स्पर्धेत ५ सामने खेळले आहेत. यात त्यांना २ सामने जिंकण्यात यश आले आहे. आजच्या सामन्यात जर पंजाब संघाने विजय मिळवला तर पंजाब संघ टॉप-४ मध्ये पोहचेल. या मोठ्या सामन्यापूर्वी पंजाब संघातील खेळाडू मैदानावर कसून घाम गाळताना दिसून येत आहेत.
अशातच युनिव्हर्सल बॉसचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये गेल मस्ती करताना दिसून येत आहे. या व्हिडिओमध्ये पंजाब संघाचे सराव सत्र सुरू असताना गेलने थ्रो मारला आणि तो योग्य ठिकाणी जाऊन लागला होता. याचाच जल्लोष म्हणून संघातील इतर खेळाडू आणि गेलने मिळून पंजाब संघाचा सिग्नेचर स्टेप भागंडा केल्याचे दिसून आले. चाहत्यांना देखील हा व्हिडिओ प्रचंड आवडत आहे. यावर चाहते अनेक प्रतिक्रीया देत आहेत. हा व्हिडिओ पंजाब संघाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.
Celebrate it like '???????????? ????????????????????' ????#SaddaPunjab #PunjabKings #IPL2021 @henrygayle @mandeeps12 @arshdeepsinghh pic.twitter.com/mGApabJ7Km
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) April 25, 2021
पंजाब संघाच्या गोलंदाजांनी गेल्या काही सामन्यात चांगली कामगिरी केली आहे. गेल्या सामन्यात कर्णधार केएल राहुल, मयंक अगरवाल आणि ख्रिस गेल यांनी चांगली फलंदाजी केली होती. तसेच पंजाब संघाचे फलंदाज चांगल्याच फॉर्ममध्ये आहेत. हे संघासाठी शुभ संकेत आहेत. तसेच कर्णधार केएल राहुल या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहे.
गेलने देखील मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात चांगली फलंदाजी केली होती. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात गेलकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
कोलकाताला पंजाबविरुद्ध सूर गवसणार? ‘अशी’ असेल राहुल-मॉर्गनच्या संघांची प्लेइंग इलेव्हन
SRHच्या गोलंदाजाने मारला अप्रतिम सिक्सर, DCची बॉलिंग बघून लोटपोट झाली ‘मिस्ट्री गर्ल’; पाहा Video
सूर्यकुमारला रिलीज करणे केकेआरची गेल्या १२ वर्षांतील सर्वात मोठी चूक, माजी कर्णधाराने साधला निशाणा






