---Advertisement---

सूर्यकुमारला रिलीज करणे केकेआरची गेल्या १२ वर्षांतील सर्वात मोठी चूक, माजी कर्णधाराने साधला निशाणा

On: सोमवार, एप्रिल 26, 2021 3:38 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा माजी फलंदाज गौतम गंभीर हा नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतो. तसेच तो आता आयपीएल २०२१ स्पर्धेत समालोचकाची भूमिका पार पाडत आहे. एकेकाळी आपल्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्स संघाला जेतेपद मिळवून देणाऱ्या गंभीरने कोलकाता संघाच्या संघ व्यवस्थापकांना धारेवर धरत मोठे वक्तव्य केले आहे.

कोलकाता संघाने आयपीएल २०२१ स्पर्धेत आतापर्यंत निराशाजनक कामगिरी केली आहे. त्यांनी आतापर्यंत एकूण ४ सामने खेळले आहेत. यात त्यांना १ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे. यानंतर गंभीरने मुंबई इंडियन्सचा धुरंधर सूर्यकुमार यादवबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.

एकेकाळी गौतम गंभीर जेव्हा कोलकाता संघाचा कर्णधार होता, तेव्हा सूर्यकुमार यादव या संघाचा उपकर्णधार होता. २०१८ मध्ये संघाने त्याला रिलीज केले होते. आता गंभीरने या निर्णयाला अयोग्य म्हटले आहे. त्याने म्हटले की, “सूर्यकुमार यादवला संघाबाहेर काढणे ही कोलकाता संघाची गेल्या १२ वर्षातील सर्वात मोठी चूक आहे.”

सूर्यकुमार यादवने २०१२ साली आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाकडून पदार्पण केले होते. या हंगामात त्याला एकच सामना खेळण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर २०१४ मध्ये त्याला कोलकाता नाईट रायडर्स संघात स्थान देण्यात आले होते. कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी ४ वर्ष खेळल्यानंतर त्याला २०१८ मध्ये रिलीज करण्यात आले होते. याच हंगामात मुंबई इंडियन्स संघाने त्याला ३.२ कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले होते. तेव्हापासून तो मुंबई इंडियन्स संघासाठी खेळत आहे. त्याने मुंबई इंडियन्स संघाच्या विजयामध्ये अनेकदा महत्वाची भूमिका बजावली आहे.

मॉर्गनबद्दलही केले होते वक्तव्य
ओएन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कोलकाता संघाने या हंगामात एकच सामना जिंकला आहे. गंभीरने वक्तव्य करत म्हटले होते की, “जर कोणी भारतीय कर्णधार असता तर सोशल मीडियावर अनेकांनी टीका केली असती.”

गौतम गंभीरने दिनेश कार्तिक वरून हे वक्तव्य केले होते. २०२० मध्ये दिनेश कार्तिकने कर्णधारपद सोडले होते. असे म्हटले जात होते की, त्याच्यावर संघ मालकांचा दबाव होता. परंतु दिनेश कार्तिकने काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते की तो त्याचा वैयक्तिक निर्णय होता.

महत्त्वाच्या बातम्या-

“अब हिंदी में नही बोल सकता”, धोनीचा यष्टीमागील संवाद स्टंप माइकमध्ये कैद; पाहा भारी व्हिडिओ

पंजाब किंग्जचे २२ कोटी पाण्यात, ज्यांच्यावर बक्कळ पैसा ओतला; तेच आता संघावर बनलेत ओझं!

जेव्हा लाईव्ह शोमध्ये अमिताभ यांनी अनुष्कापुढे काढलं विराटचं नाव, लाजेने लालबुंद झाली ‘मिसेस कोहली’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---