---Advertisement---

“अब हिंदी में नही बोल सकता”, धोनीचा यष्टीमागील संवाद स्टंप माइकमध्ये कैद; पाहा भारी व्हिडिओ

On: सोमवार, एप्रिल 26, 2021 2:58 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार व आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचे (सीएसके) नेतृत्व करणारा एमएस धोनी हा आपल्या कल्पक नेतृत्वासाठी ओळखला जातो. यासोबतच क्षेत्ररक्षणा दरम्यान संघ सहकाऱ्यांना यष्टीमागून तो वारंवार सूचना देताना दिसतो. या दरम्यान तो कधीकधी विनोदी बोलतो. आयपीएल २०२१ मध्ये देखील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरूद्धच्या सामन्यात त्याचे हे रूप चाहत्यांना पुन्हा एकदा पाहायला मिळाले.

‘अब हिंदी में नही बोल सकता’
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या आयपीएल २०२१ मधील १९ व्या सामन्यात सीएसकेने आरसीबीवर ६९ धावांनी मोठा विजय मिळवला. या सामन्यात धोनीने संघाचे जबरदस्त नेतृत्व केले. यावेळी तो सातत्याने आपल्या गोलंदाजांना मार्गदर्शन करत होता. मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स व कायले जेमिसन हे विदेशी फलंदाज फलंदाजी करत असताना तो हिंदीमध्ये गोलंदाजांना सूचना देत.

एबी डिव्हिलियर्स बाद होऊन परतल्यानंतर आठव्या क्रमांकावर अष्‍टपैलू हर्षल पटेल मैदानावर उतरला. त्यावेळी दोन्ही जडेजाला उद्देशून म्हणाला, “अब हिंदी में नहीं बोल सकता हू.” धोनीच्या या वक्तव्यानंतर स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करत असलेला सुरेश रैना व गोलंदाज रवींद्र जडेजा त्यांना हसू आले.

याच सामन्यात धोनी मॅक्सवेल व डिव्हिलियर्स विरुद्ध कशी गोलंदाजी करायची? हे क्षणाक्षणाला आपल्या गोलंदाजाना सांगताना दिसत होता.

https://twitter.com/Shariff_ladka_/status/1386584463295926272

चेन्नईचा धमाकेदार विजय
सलामीवीर फाफ डू प्लेसिसच्या संयमी अर्धशतकानंतर अष्टपैलू रवींद्र जडेजाने केवळ २८ चेंडूत नाबाद ६२ धावा केल्यामुळे सीएसकेने आरसीबीसमोर १९२ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र जडेजाने गोलंदाजीतही कमाल करताना तीन बळी मिळविले आणि सीएसकेला सलग चौथा विजय मिळवून दिला. या विजयासह सीएसके गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला.

महत्त्वाच्या बातम्या-

रजनी सर म्हातारे होत आहेत, म्हणून देवाने सर जडेजाला बनवलं; सर्वत्र रंगली माहीच्या ‘त्या’ ट्विटची चर्चा

सिराजला हलक्यात घेणाऱ्या जडेजाला वेगवान गोलंदाजाने ‘अशी’ दाखवली भिती, पाहा व्हिडिओ

जेव्हा लाईव्ह शोमध्ये अमिताभ यांनी अनुष्कापुढे काढलं विराटचं नाव, लाजेने लालबुंद झाली ‘मिसेस कोहली’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---