---Advertisement---

SRHच्या गोलंदाजाने मारला अप्रतिम सिक्सर, DCची बॉलिंग बघून लोटपोट झाली ‘मिस्ट्री गर्ल’; पाहा Video

On: सोमवार, एप्रिल 26, 2021 4:14 PM
---Advertisement---

आयपीएल २०२१ स्पर्धेत सनरायजर्स हैदराबाद संघाची संघ मालक काव्या मारन ही सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनून आहे. सनरायजर्स हैदराबाद संघाच्या प्रतेक सामन्यानंतर तिचे स्टेडियममधील फोटोज् आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. असाच आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये शेवटच्या षटकात जगदीशा सुचितने मारलेल्या षटकारनंतर ती मनसोक्त हसताना दिसून येत आहे.

रविवारी (२५ एप्रिल) पार पडलेल्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ आमने सामने होते. दिल्ली संघाने प्रथम फलंदाजी करताना १५९ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना हैदराबाद संघातील फलंदाजांनी तुफान फटकेबाजी केली होती. शेवटच्या षटकात हैदराबाद संघाला जिंकण्यासाठी १६ धावांची आवश्यकता होती. दिल्ली संघाकडून रबाडा गोलंदाजी करत होता. त्याच्या तिसऱ्याच चेंडूवर फिरकी गोलंदाज सुचितने षटकार लगावला होता.

हा षटकार पाहून स्टेडियममध्ये बसलेली काव्या मारन आपल्या खुर्चीवर बसून हसत आपला आनंद व्यक्त करत होती. चक्क आपल्या संघातील एका गोलंदाजाने विरोधी संघाच्या प्रमुख गोलंदाजाच्या चेंडूवर षटकार मारल्याने तिला हसू आवरले नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. परंतु हे हास्य जास्त वेळ टिकू शकले नाही. या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये हैदराबाद संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

https://twitter.com/ribas30704098/status/1386391130464419842?s=20

या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळाला होता. हैदराबाद संघाला देखील २० षटक अखेर १५९ धावा करता आल्या होत्या. त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये हैदराबाद संघाकडून प्रथम फलंदाजी करण्यासाठी डेविड वॉर्नर आणि केन विलियमसन यांची जोडी मैदानात आली होती. परंतु या दोघांनीही ६ चेंडूत अवघ्या ७ धावा करण्यात यश आले होते.

हैदराबादच्या ८ धावांचा पाठलाग करताना दिल्ली संघाकडून स्वतः कर्णधार रिषभ पंत आणि शिखर धवन यांची जोडी मैदानात आली होती. या दोघांनीही ८ धावांचा यशस्वी पाठलाग करत, दिल्ली संघाला विजय मिळवून दिला.

महत्वाच्या बातम्या-

सूर्यकुमारला रिलीज करणे केकेआरची गेल्या १२ वर्षांतील सर्वात मोठी चूक, माजी कर्णधाराने साधला निशाणा

जेव्हा लाईव्ह शोमध्ये अमिताभ यांनी अनुष्कापुढे काढलं विराटचं नाव, लाजेने लालबुंद झाली ‘मिसेस कोहली’

“अब हिंदी में नही बोल सकता”, धोनीचा यष्टीमागील संवाद स्टंप माइकमध्ये कैद; पाहा भारी व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---