वेस्ट इंडिज संघाचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल मैदानावर जितका आक्रमक असतो, तो मैदानाबाहेर तितकाच मजेशीर आहे. गेल नेहमीच मस्करीच्या मूडमध्ये असतो. तो मैदानात क्षेत्ररक्षण करताना तसेच ड्रेसिंग रूममध्ये खूप मजा- मस्करी करत असतो. तरीही २०१५ मध्ये बिग बॅश लीगमध्ये त्याला त्याची मस्करी खूपच महागात पडली होती. गेलला यासाठी दंडही भरावा लागला होता तसेच त्याला बीबीएल स्पर्धेतून बाहेरचा रस्ताही दाखविला होता.
बिग बॅश लीगमध्ये गेलची जीभ घसरली
बीबीएल म्हणजेच बीग बॅश लीगमध्ये (Big Bash League) २०१५-१६ दरम्यान गेल (Chris Gayle) विवादात अडकला होता. गेलने ऑस्ट्रेलियाची टीव्ही प्रेझेंटर मेल मॅकलॉफ्लिनला (Mel McLaughlin) म्हटले होते की, “मला तुला मुलाखत द्यायची होती. त्यामुळे मी इथे आहे. मला पहिल्यांदा तुझे डोळे पहायला मिळाले, हे खूप चांगले आहे. आशा आहे की, विजयानंतर आपण ड्रिंकवर जाऊ शकतो. बेबी लाजू नकोस.”
गेलच्या या वक्तव्यानंतर मॅकलॉफ्लिन नाराज झाली होती. तिने पोलिसात तक्रारदेखील केली होती. परंतु त्यानंतर न्यायालयाने हा खटला सोडवला. त्यानंतर गेलला त्या लीगसाठी निलंबित केले होते. त्याचबरोबर गेलला १० हजार डॉलर्सचा दंडदेखील ठोठावला होता. ते त्याने नंंतर भरले होते.
https://twitter.com/fudgie8/status/683992694327099392
त्यानंतर गेलने आपल्या वादग्रस्त विधानानंतर मॅकलॉफ्लिनची माफी मागितली होती. गेलने माफी मागत म्हटले होते की त्याचे विधान चुकीच्या पद्धतीने घेतले गेले तसेच त्याला कोणाचाही अपमान करायचा नव्हता.
ट्रेंडिंग घडामोडी-
-अझरुद्दीनच्या पत्नीमुळे प्रेक्षकांशी भिडला होता हा पाकिस्तानी खेळाडू; कोर्टामध्ये गेले होते प्रकरण
-ऑस्ट्रेलियाला बसला मोठा धक्का! या माजी कर्णधाराचे झाले निधन
-चांगले फलंदाजी तंत्र नसतानाही आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवलेले ५ फलंदाज