---Advertisement---

विश्वचषक २०१९ : …तर ख्रिस गेल आउट झाला नसता!

On: शुक्रवार, जून 7, 2019 3:53 PM
---Advertisement---

नॉटिंगहॅम। गुरुवारी(6 जून) 2019 विश्वचषकातील 10 वा सामना विंडीज विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात ट्रेंट ब्रिज मैदानावर पार पडला. अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 15 धावांनी विजय मिळवला. मात्र या सामन्यात पंचाच्या चूकीच्या निर्णयांमुळे वाद निर्माण झाले आहेत.

झाले असे की या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 289 धावांच्या आव्हानाचा विंडीज पाठलाग करत असताना सलामीवीर फलंदाज ख्रिस गेल 5 व्या षटकातील पाचव्या चेंडूवर पायचीत बाद झाला. पण हा चेंडू खरंतर फ्रि हीट असायला हवा होता. कारण स्टार्कने या षटकातील चौथ्या चेंडूवर मोठा नो बॉल टाकला होता.

पण मैदानावरील पंचांच्या हे लक्षात आले नाही. त्यामुळे त्यांनी हा चेंडू ग्राह्य धरला. जर हा चेंडू नो बॉल दिला असता तर गेल बाद झालेला चेंडू फ्रि हीट असायला हवा होता. मात्र पंचांच्या दुर्लक्षपणामुळे गेलला त्याची विकेट गमवावी लागली.

विशेष म्हणजे याच सामन्यात स्टार्कने गोलंदाजी केलेल्या तिसऱ्या षटकात दोन वेळा पंचांनी गेलला बाद दिले होते. परंतू त्याने या दोन्ही वेळेला रिव्ह्यू घेतला आणि त्यात तो नाबाद असल्याचे दिसले.

गेल 17 चेंडूत 21 धावा करुन बाद झाल्यानंतर शाय होप आणि निकोलस पूरनने विंडीजचा डाव सांभाळत तिसऱ्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी केली. पण पूरनला ऍडम झम्पाने 40 धावांवर बाद केले. होपने एक बाजू टिकवून ठेवत नंतर शिमरॉन हेटमेयर बरोबर चौथ्या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी केली. मात्र हेटमेयर 21 धावा करुन बाद झाला.

यानंतर मात्र विंडीजच्या फलंदाजांनी नियमित कालांतराने विकेट घालवल्या. होपही 68 धावा करुन बाद झाला. पण विंडीजचा कर्णधार जेसन होल्डरने चांगली खेळ करत एक बाजू सांभाळत 51 धावा केल्या. मात्र त्याला अन्य फलंदाजांची योग्य साथ मिळाली नाही. त्यामुळे विंडीजला 50 षटकात 9 बाद 273 धावाच करता आल्या.

ऑस्ट्रेलियाकडून स्टार्कने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तसेच पॅट कमिन्सने 2 आणि ऍडम झम्पाने 1 विकेट घेतली.

तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 49 षटकात सर्वबाद 288 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाकडून स्टिव्ह स्मिथ(73) आणि नॅथन कुल्टर-नाईलने(92) अर्धशतकी खेळी केली.

विंडीजकडून कार्लोस ब्रेथवेटने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच ओशान थॉमस, शेल्डन कॉट्रेल आणि आंद्रे रसलने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या, तर कर्णधार जेसन होल्डरने 1 विकेट घेतली.

https://twitter.com/Kattehaiklu/status/1136642551782334464

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडीबातम्यासदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

संपूर्ण वेळापत्रक: असा असेल टीम इंडियाचा जानेवारी २०२० मध्ये होणारा न्यूझीलंड दौरा

विश्वचषक २०१९: अफगाणिस्तानचा हा महत्त्वाचा खेळाडू विश्वचषकातून बाहेर, जाणून घ्या कारण

विश्वचषक २०१९: १९ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत मिशेल स्टार्कने रचला नवा विश्वविक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment