---Advertisement---

मोठी बातमी! ख्रिस गेलने ‘या’ कारणामुळे सोडले बायो-बबल, उर्वरित आयपीएलमधूनही बाहेर

On: शुक्रवार, ऑक्टोबर 1, 2021 1:26 AM
---Advertisement---

इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाचा दुसरा टप्पा संयुक्त अरब अमिराती येथे खेळला जात आहे. सध्या साखळी फेरीतील अखेरचे काही सामना बाकी राहिल्याने प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी संघांमधील शर्यत चूरशीची झाली आहे. अशातच पंजाब किंग्सला मोठा धक्का बसला आहे. संघाचा अनुभवी आणि आक्रमक फलंदाज ख्रिस गेलने गुरुवारी (३० सप्टेंबर) बायोबबल सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तो उर्वरित आयपीएल २०२१ मधूनही बाहेर पडला आहे.

पंजाब किंग्सने याबद्दल माहिती दिली आहे. गेल्याच्या उर्वरित आयपीएल २०२१ मधून माघार घेण्यामागचे कारण बायोबबलमुळे येणारा थकवा असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच गेलला आगामी टी२० विश्वचषकासाठी ताजेतवाने राहायचे आहे.

पंजाब किंग्सने दिलेल्या माहितीनुसार गेल गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने फ्रँचायझी क्रिकेट आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी बायोबबलमध्ये होता. तो श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात खेळलेल्या गेल्या मालिकांसाठी वेस्ट इंडिज संघाचा भाग होता. तसेच त्यानंतर तो कॅरेबियन प्रीमीयर लीग खेळून थेट आयपीएलसाठी दाखल झाला होता.

त्यामुळे गेलने त्याच्या मानसिक आरोग्याला प्राधान्य देत उर्वरित आयपीएलमधून माघार घेतली आहे. हा निर्णय गेलने आगामी टी२० विश्वचषकाच्या दृष्टीनेही घेतला आहे. त्याला या विश्वचषकात मानसिकरित्या ताजेतवाने होऊन वेस्ट इंडिजसाठी खेळायचा आहे. गेलच्या या निर्णयाचा आदर करतो, असे म्हणत पंजाब किंग्सने त्याचा निर्णय मान्य केला आहे. तसेच त्यांनी त्याला १७ ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या विश्वचषकासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

गेलला ५००० धावा पूर्ण करण्याची होती संधी
ख्रिस गेल आयपीएलमधील दिग्गज फलंदाज मानला जातो. त्याने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये १४२ सामने खेळले असून ३९.७२ च्या सरासरीने ४९६५ धावा केल्या आहेत. त्याने आयपीएलमधील सर्वोच्च नाबाद १७५ धावांची खेळी केली आहे. त्याला आयपीएलमध्ये ५००० धावा पूर्ण करण्यासाठी केवळ ३५ धावांची गरज होती. मात्र, आता तो आयपीएल २०२१ मधून बाहेर झाला आहे. गेलने आयपीएल २०२१ हंगामात १० सामने खेळले होते. यात त्याने १९३ धावा केल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या – 

धोनीचा विजयी षटकार अन् लाडकी लेक झिवाचा जल्लोष, व्हिडिओ होतोय व्हायरल

“कधी मलाही चहाला बोलव”; भज्जीने केले रोहितला ट्रोल; मजेदार आहे कारण

धोनीने हैदराबादविरुद्ध ३ झेल घेत मोठ्या विक्रमाला घातली गवसणी, बाकी कोणी जवळपासही नाही

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---