---Advertisement---

‘यूनिवर्स बॉस’ ख्रिस गेलने शतक करत अ दर्जाच्या क्रिकेटला केला गुडबाय

On: रविवार, ऑक्टोबर 7, 2018 5:32 PM
---Advertisement---

विंडि़जचा धडाकेबाज सलामीवीर फलंदाज ख्रिस गेलने अ दर्जाच्या क्रिकेटमधून शनिवारी(6 आॅक्टोबर) निवृत्ती घेतली आहे. त्याने शनिवारी जमैकाकडून खेळताना बार्बाडोस विरुद्ध शतक ठोकत अ दर्जाच्या क्रिकेट कारकिर्दीचा शेवट केला.

त्याने ब्रिजटाउन येथे रिजनल सुपर 50 स्पर्धेत खेळताना 114 चेंडूत 122 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 10 चौकार आणि 8 षटकार मारले. त्याच्या या खेळीच्या जोरावर जमैकाने हा सामना 33 धावांनी जिंकला आहे.

या सामन्यात तो जेव्हा फलंदाजीसाठी मैदानात आला तेव्हा दोन्ही संघाच्या खेळाडूंनी त्याला गार्ड आॅफ आॅनर दिला होता.

सामन्यानंतर बोलताना तो म्हणाला मला जमैकासाठी चार दिवसीय सामना खेळायला आवडेल. त्याचबरोबर तो पुढे म्हणाला, ‘जमैकासाठी माझ्या शेवटच्या 50 षटकांच्या सामन्यात शतक करणे नक्कीच आनंददायी आहे. ही गोष्ट मला नेहेमीच आनंद देईल.”

या सामन्यात गेलने जमैकाचे नेतृत्व केले होते. त्याबद्दल गेल म्हणाला, “संघाचे नेतृत्व करताना विजय मिळवणे खास असते. माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करताना संघाचे नेतृत्व करणे आनंद देणारे आहे. मी कृतज्ञ आहे की 39 वर्षांचा असतानाही मी जमैकासाठी माझ्या शेवटच्या सामन्यात शतक केले.”

तसेच गेल पुढे म्हणाला, “अजून खूप काही शिल्लक आहे. पण क्रिकेटव्यतिरिक्तही आयुष्य आहे. त्यामुळे मला त्याचीही मजा घ्यायची आहे. 25 वर्षे क्रिकेट खेळणे हे नक्कीच मोठे यश आहे, असा माझा वैयक्तिक दृष्टिकोन आहे. पण मला कुटुंब आहे. मला त्यांच्याबरोबर वेळ घालवायचा आहे आणि माझ्या मुलांना मोठे होताना पहायचे आहे.”

“सबिना पार्क येथे होणारा चार दिवसीय सामना मी खेळू शकतो. मला जर हा सामना खेळणे शक्य झाले तर मी नक्की खेळेल. मला माहित नाही तो कधी चालू होणार आहे. पण मी वेळापत्रक पाहिलं आणि मला त्यावेळी उपलब्ध ठेवण्याचा प्रयत्न करेल.”

गेलने 2001 मध्ये जमैकासाठी लिआॅन गॅरिक बरोबर विक्रमी 400 धावांची भागीदारी रचली होती. ही त्याची सर्वात चांगली आठवण आहे, असे त्याने सांगितले आहे. त्यावेळी गेल 21 वर्षांचा होता आणि त्याने 208 तर लिआॅनने 200 नाबाद धावा केल्या होत्या.

याबद्दल गेल म्हणाला, ” ती भागीदारी खास आहे. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील नाही तर जमैकासाठीची माझी सर्वात खास आठवण आहे.

त्याचबरोबर तो म्हणाला “कसोटीतील दोन त्रिशतके, वनडेमधील द्विशतक आणि विंडिजकडून टी20 मधील केलेले माझे पहिले शतक हे सर्व खास आहे. पण ती 400 धावांची भागीदारी यापेक्षा वेगळी आहे.”

गेलने आत्तापर्यंत अ दर्जाचे 356 सामने खेळले असून यात त्याने 38.14 च्या सरासरीने 12436 धावा केल्या आहेत. यात त्याने 27 शतके आणि 65 अर्धशतके केली आहेत. तसेच 227 विकेट्सही गेलने घेतल्या आहेत.

असे असले तरी गेल टी20 क्रिकेटमध्ये त्याचा खेळ सुरु ठेवणार आहे. तो पुढे शारजामध्ये होणाऱ्या पहिल्याच अफगाण प्रिमीयर लीगमध्ये बाल्ख लिजंड्सकडून खेळणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

दुसऱ्या कसोटीत विराटने विश्रांती घ्यावी आणि मयंक अगरवालला खेळवावे

परदेश दौऱ्यात पत्नीला सोबत घेऊन जाण्यासाठी खेळाडूंना परवानगी द्यावी, विराट कोहलीची बीसीसीआयला विनंती

विराट कोहली आणि टीम इंडियाकडून शिकण्याचा विंडिजला फायदा होईल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment