नॉटिंगहॅम। आज(3 जून) 2019 आयसीसी विश्वचषकात पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड संघात ट्रेंट ब्रिज मैदानावर सामना सुरु आहे. या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 बाद 348 धावा केल्या असून इंग्लंड समोर विजयासाठी 50 षटकात 349 धावांचे आव्हान ठेवले आहे.
इंग्लंडच्या गोलंदाजांकडून जरी या सामन्यात विशेष कामगिरी झाली नसली इंग्लंडकडून ख्रिस वोक्सने क्षेत्ररक्षणात चमकदार कामगिरी केली आहे. त्याने या सामन्यात 4 झेल घेतले आहेत. तसेच त्याने विश्वचषकात एका सामन्यात क्षेत्ररक्षक म्हणून सर्वाधिक झेल घेण्याच्या विश्वविक्रमाचीही बरोबरी केली आहे.
त्याचबरोबर तो विश्वचषकात एका सामन्यात क्षेत्ररक्षक म्हणून चार झेल घेणारा केवळ चौथा खेळाडू ठरला आहे. याआधी मोहम्मद कैफ, सौम्य सरकार आणि उमर अकमलने विश्वचषकाच्या एका सामन्यात सर्वाधिक चार झेल घेण्याचा कारनामा केला आहे.
वोक्सने पाकिस्तानच्या इमाम उल हक, बाबर आझम, मोहम्मद हाफिज आणि कर्णधार सर्फराज अहमदचे झेल घेतले. यातील सर्फराजचा झेल वोक्सने स्वत:च्याच गोलंदाजीवर घेतला. त्याच्या या सर्व शानदार झेलांचा व्हिडिओ आयसीसीने विश्वचषकाच्या अधिकृत वेबसाईटवर शेअर केले आहेत.
याबरोबरच वोक्सने या सामन्यात क्षेत्ररक्षणाबरोबरच गोलंदाजीतही तीन विकेट घेतली चांगली कामगिरी केली आहे.
या सामन्यात पाकिस्तानकडून प्रथम फलंदाजी करताना आझम, हाफिज आणि सर्फराजने अर्धशतकी खेळी केल्या आहेत. आझमने 63, हाफिजने 84 आणि सर्फराजने 55 धावांची खेळी केली.
तसेच सुरुवातीला इमाम उल हक आणि फकार जामनने पाकिस्तानला चांगली सुरुवात करुन देताना अनुक्रमे 44 आणि 36 धावांची छोटेखानी खेळी केली.तसेच 82 धावांची सलामी भागीदारीही रचली.
इंग्लंडकडून गोलंदाजीत वोक्सबरोबरच मोईन अलीनेही 3 विकेट्स घेतल्या. तर मार्क वूडने 2 विकेट्स घेतल्या.
विश्वचषकात एका सामन्यात क्षेत्ररक्षक म्हणून सर्वाधिक झेल घेणारे क्रिकेटपटू –
4 झेल – मोहम्मद कैफ (विरुद्ध श्रीलंका, 10 मार्च 2003)
4 झेल – सौम्य सरकार (विरुद्ध स्कॉटलंड, 5 मार्च 2015)
4 झेल – उमर अकमल (विरुद्ध आयर्लंड, 15 मार्च 2015)
4 झेल – ख्रिस वोक्स (विरुद्ध पाकिस्तान, 3 जून 2019)
Chris Woakes' four catches today means that he's equalled the record for the most catches taken by an outfielder in a #CWC match. pic.twitter.com/7uhJlLTfI7
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) June 3, 2019
On a scale of 😮 to 😵 how stunning was this catch from @chriswoakes? https://t.co/Z5UxjHoFbo
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) June 3, 2019
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–विराट कोहलीच्या टीम इंडियाला भारतीय फुटबॉल संघाकडून खास शुभेच्छा, पहा व्हिडिओ
–विश्वचषक २०१९: पहिल्या सामन्याआधी टीम इंडियाचा हा खेळाडू झाला फिट, पण खेळण्यावर अजूनही प्रश्नचिन्ह
–…म्हणून विराट कोहलीने २०१७नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करणे सोडले