---Advertisement---

विश्वचषक २०१९: पहिल्या सामन्याआधी टीम इंडियाचा हा खेळाडू झाला फिट, पण खेळण्यावर अजूनही प्रश्नचिन्ह

On: सोमवार, जून 3, 2019 5:59 PM
---Advertisement---

साऊथँम्पटन। 2019 विश्वचषकात भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध बुधवारी खेळणार आहे. या सामन्याआधी भारताचा क्रिकेटपटू केदार जाधवने खांद्याच्या दुखापतीतून सावरत असताना नेटमध्ये सराव केल्याने भारतीय संघासाठी चांगले संकेत दिले आहेत.

काही रिपोर्ट्सच्या नुसार त्याने भारताच्या पूर्ण सराव सत्रातही भाग घेतला आहे. त्याला फलंदाजी करताना कोणताही त्रास जाणवलेला नाही. त्याचबरोबर त्याने गोलंदाजी करण्यासही सुरुवात केली आहे. पण असे असले तरी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केदारच्या खेळण्यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे.

त्याला या दुखापतीमुळे विश्वचषकाआधी पार पडलेल्या न्यूझीलंड आणि बांगलादेश विरुद्धच्या सराव सामन्यात खेळवण्यात आले नव्हते.

केदारला आयपीएल 2019 मध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध साखळी फेरीत खेळताना खांद्याची दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला काही आठवडे क्रिकेटपासून दूर रहावे लागले होते. पण या दुखापतीनंतर तो विश्वचषकासाठी फिट होईल या अपेक्षेने त्याला भारतीय संघात कायम ठेवले आहे.

केदारनेही काही दिवसांपूर्वी नेटमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजी करतानाचा त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडिओला त्याने कॅप्शन दिले होते की ‘नेटमध्ये परत येऊन चांगले वाटत आहे.’

त्यामुळे आता केदारने नेटमध्ये सरावाला सुरुवात केली असल्याने त्याला पहिल्या सामन्यात संधी मिळणार का हे पहावे लागेल.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडीबातम्यासदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

…म्हणून विराट कोहलीने २०१७नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करणे सोडले

विश्वचषक २०१९: दक्षिण आफ्रिकेला मोठा झटका, भारताविरुद्ध खेळणार नाही हा मोठा खेळाडू

वाढदिवस विशेष: सुलतान ऑफ स्विंग – वसीम अक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment