---Advertisement---

आयपीएलसाठी नाव न नोंदवल्याचा इंग्लिश खेळाडूला होतोय पश्चाताप; म्हणाला, “खूप पैसा भेटला असता…”

On: सोमवार, डिसेंबर 19, 2022 8:13 PM
England-Cricket-Team
---Advertisement---

जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील हंगामासाठी लिलाव 23 डिसेंबर रोजी होणार आहे. या लिलावासाठी खेळाडूंची अंतिम यादी जाहीर झाली आहे. कोची येथे होणाऱ्या या मिनी लिलावात 405 खेळाडूंचे नाव पुकारले जाईल. इंग्लंडचा अष्टपैलू ख्रिस वोक्स याने या लिलावासाठी नावनोंदणी केली नाही. मात्र, आपल्यासाठी हा निर्णय घेणे अतिशय कठीण गेल्याचे त्याने सांगितले आहे.

वोक्स याने एका क्रिकेट संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले,

“हा निर्णय अजिबात सोपा नव्हता. अजूनही मला वाटते की, मी आयपीएलमध्ये सहभागी व्हावे. कारण, ही एक मोठी स्पर्धा आहे. त्यात खेळून तुम्हाला आर्थिकदृष्ट्याही खूप फायदा होतो. मात्र, केवळ पैशांसाठी मी कोणताही निर्णय घेत नाही. आम्ही नुकताच विश्वचषक जिंकला आहे. आयपीएलमध्ये जगातील सर्वोत्तम खेळाडू खेळतात. आर्थिक लाभही होतो. तुमच्या कारकिर्दीसाठी देखील ते उपयुक्त ठरते.”

तो पुढे बोलताना म्हणाला,

“यावर्षी ऍशेसही खेळली जाणार आहे. त्यामुळे मला काऊंटी चॅम्पियनशिपमध्ये वॉर्विकशायरसाठी खेळायचे होते. कारण मी या हंगामात फारसे क्रिकेट लाल चेंडूने खेळलेलो नाही. केवळ सराव व्हावा याच उद्देशाने मी हा निर्णय घेतला.”

‌ ख्रिस वोक्सबद्दल बोलायचे झाले तर, त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये तीन फ्रँचायझींचे प्रतिनिधित्व केले आहे. 2017 च्या हंगामात तो कोलकाता नाइट रायडर्स संघाचा भाग होता. तर 2018 च्या हंगामात त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि 2021 च्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व केलेले. मात्र, आता त्याने 2023 च्या हंगामात न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. तो आयपीएल लिलावात सहभागी झाला असता तर, त्याच्या अष्टपैलू क्षमतेमुळे अनेक संघांनी त्याच्यावर मोठी बोली लावली असती.

(Chris Woakes Regret For Not Participate In IPL 2023)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
फुटबॉलचा नवा राजकुमार! हॅट्रिक मारत अर्जेंटिनाच अवसान घालवलेला बाजीगर एम्बाप्पे
लेकाने विश्वचषक जिंकताच थेट मैदानात धावली आई, आनंदाच्या भरात मेस्सीला मारली मिठी 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---