---Advertisement---

…तर भारतीय संघाला एकही कसोटी सामना जिंकता येणार नाही, मायकल क्लार्कची भविष्यावाणी

On: बुधवार, नोव्हेंबर 25, 2020 6:15 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बहुप्रतीक्षित कसोटी मालिकेला डिसेंबर महिन्यात सुरुवात होईल. भारतीय कर्णधार विराट कोहली 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिलाच कसोटी सामान खेळून भारतात परतणार आहे. त्याने पालकत्व रजा घेतली आहे. त्याच्या अनुपस्थितीत भारतीय संघ कसोटी मालिका जिंकणार का? हा प्रश्न सर्वांनाच पडला असेल. आता ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कने याबाबत आपले मत व्यक्त केले आहे.

…तर विराटच्या अनुपस्थितही भारतीय संघ कसोटी मालिकेत ठरेलं वरचढ

मायकल क्लार्कला विश्वास आहे की वनडे आणि टी20 मालिकेत चांगली कामगिरी करून भारतीय संघ कसोटी मालिकेच्या निकालात महत्वपूर्ण भूमिका निभावू शकतो.

स्काय स्पोर्ट्स रेडिओच्या प्रतिनिधीशी बोलताना क्लार्क म्हणाला की, “भारतीय संघ वनडे आणि टी20 मालिकेत वर्चस्व राखण्यात यशस्वी ठरला, तर विराटच्या अनुपस्थितीतही हा संघ कसोटी मालिकेत चांगली कामगिरी बजावू शकतो.”

…तर भारतीय संघाचा 0-4 असा पराभव होईल

“जर वनडे आणि टी20 मालिकेत भारतीय संघाने यश संपादन केले नाही, तर कसोटी सामन्यांमध्ये ते मोठ्या संकटात सापडतील आणि माझ्या मते त्यांना 0-4 अशा पराभवाला सामोरे जावे लागेल.”असेही पुढे बोलताना क्लार्क म्हणाला

वार्नर आणि स्मिथविरुद्ध बुमराह ठरला यशस्वी

भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहबद्दल बोलताना क्लार्क म्हणाला की, “तो वेगवान गोलंदाजी करतो, त्याची शैली पूर्णपणे वेगळी आहे. मला वाटते की ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनाविरुद्ध आक्रमकपणे गोलंदाजी करण्याची गरज आहे. सलामीवीर डेविड वॉर्नरला रोखण्यात बुमराहला यश आले असून स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथविरुद्धही तो प्रभावी ठरू शकतो.”

कोहली आणि बुमराहवर असेल अधिक जबाबदारी

“बुमराह या मालिकेत किती बळी घेतो यावरच हे अवलंबून नाही, तर तो कसा गोलंदाजी करतो यावर अवलंबून आहे. डेविड वॉर्नरविरूद्ध त्याला यश मिळत आहे, त्याने बर्‍याच वेळा वॉर्नरला बाद केले आहे. स्टीव्ह स्मिथसारख्या दिग्गज फलंदाजांविरुद्ध तो सातत्याने शॉर्ट चेंडू फेकण्यात यशस्वी ठरला आहे. या दोघांनाही (कोहली आणि बुमराह) ऑस्ट्रेलियाविरूद्ध मोठी जबाबदारी पार पाडावी लागेल.”असेही पुढे बोलताना क्लार्क म्हणाला.

ऑस्ट्रेलियामध्ये 2018-19 मध्ये प्रथमच कसोटी मालिका जिंकून भारताने इतिहास रचला होता.

महत्त्वाच्या बातम्या –

टी२०, कसोटी मालिकेआधीच न्यूझीलंडचे दोन स्टार खेळाडू पडले बाहेर; सँटेनर करणार नेतृत्व

जेव्हा ‘मुंबईकर’ सचिन तेंडुलकर रस्ता चुकल्यावर साधतो रिक्षाचालकाशी मराठीतून संवाद, पाहा व्हिडिओ

भारीच! विराट कोहली बनू शकतो ऑस्ट्रेलियाविरुद्ध ‘अशी’ कामगिरी करणारा इतिहासातील पहिला खेळाडू

ट्रेंडिंग लेख

बॅगी ग्रीन- कहाणी जगातील सर्वात प्रसिद्ध ऑस्ट्रेलियन क्रिकेट कॅपची

विश्वास बसणार नाही! ‘हे’ तीन भारतीय ऑस्ट्रेलियाविरुद्ध ठोकू शकले नाहीत वनडे शतक

‘चकदाह एक्सप्रेस’ म्हणून ओळखली जाणारी झुलन गोस्वामी; वाचा तिच्याबद्दल १० मनोरंजक गोष्टी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---