---Advertisement---

ब्रेकिंग- तिसऱ्या कसोटी सामन्यातून बेन स्टोक्स बाहेर? जाणून घ्या काय आहे कारण

On: बुधवार, जुलै 22, 2020 3:18 PM
---Advertisement---

इंग्लंडचा स्टार अष्टपैलू क्रिकेटर बेन स्टोक्सने एकट्याच्या जीवावर इंग्लंडला कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात शानदार विजय मिळवून दिला. याचबरोबर संघाने मालिकेत वेस्ट इंडिजविरुद्ध १-१ बरोबरी साधली.

पहिल्या कसोटीत व्हिलन ठरलेला स्टोक्स लगेच दुसऱ्या कसोटी सामन्यात हिरो ठरला. फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षणात तो खऱ्या अर्थाने कसोटीत हिरो ठरला. याचमुळे या सामन्याचा तो हिरो ठरला. सध्या याच खेळाडूचे जगभरात कौतूक होत आहे.

इंग्लंड संघाचे प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवुड यांनी मात्र आता स्टोक्सबद्दल भाष्य करताना म्हटले की, “त्याला तिसऱ्या कसोटीत विश्रांती दिली जावू शकते. स्टोक्स संघात असल्यावर इंग्लंड एक मजबूत संघ असतो, तरीही त्याला आम्ही विश्रांती देण्याचा विचार करत आहोत. ”

इंग्लंड मालिकेतील तिसरा व शेवटचा सामना शुक्रवारपासून सुरु होणाऱ्या सामन्यात खेळत असून दोन्ही संघ सुरुवातीचा एक एक कसोटी सामना जिंकले आहेत. अशातच येत्या काळात अतिशय कमी दिवसांत इंग्लंड अनेक क्रिकेट सामने खेळणार आहे.

यात कसोटी, वनडे व टी२० अशा तीनही प्रकारात स्टोक्स खेळत  असल्याने त्याला विश्रांती देणे इंग्लंड संघव्यवस्थापनाला गरजेचे वाटते. तर इंग्लंडसाठी दुसऱ्या बाजूला शेवटचा कसोटी सामना जिंकणे अतिशय गरजेचे असल्याने ते कसा निर्णय घेतात, हे पहाणे औत्युक्याचे ठरणार आहे.

वाचा- फक्त बेन स्टोक्स भारताकडून पाहिजे; टीम इंडियाला जगात कुणी पराभूत करु शकत नाही, पहा कोण म्हणतंय हे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---