---Advertisement---

‘हिटमॅन’च्या प्रशिक्षकाने २०११ विश्वचषकावेळी दिला होता यशाचा मंत्र, त्यानंतर रोहितचा झाला ‘रो-हिट’

On: शुक्रवार, मे 21, 2021 4:31 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा आक्रमक सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा हा गेल्या काही सामन्यांपासून चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला ३-१ ने विजय मिळवून देण्यात रोहित शर्माने मोलाची भूमिका बजावली होती. येत्या १८ ते २२ जून दरम्यान भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्यापूर्वी त्याचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी त्याच्या कामगिरीबद्दल भाष्य केले आहे.

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रोहित शर्माकडून सर्वांनाच चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

अशातच त्याचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी एका मुलाखतीत म्हटले की, “इंग्लंडची परिस्थिती पाहता ड्यूक चेंडूमुळे रोहित शर्माच नव्हे तर संघातील इतर फलंदाज देखील अडचणीत येतील. परंतु मला विश्वास आहे की, एकदा रोहित शर्मा खेळपट्टीवर टिकला तर त्याला बाद करणे खूप कठीण जाईल. रोहितने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर झालेल्या कसोटी मालिकेत उल्लेखनीय कामगिरी केली होती. इथे संघाने त्याला सलामी फलंदाजी करण्याची संधी दिली होती. त्यांनतर त्याने आपली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडली. त्यामुळे मला विश्वास आहे की, तो विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात देखील चांगला कामगिरी करेल.”

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेपूर्वी न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात २ सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे न्यूझीलंड संघाला सराव करण्याची उत्तम संधी मिळाली आहे. परंतु भारतीय संघाला सराव सामना खेळता येणार नाही. याबाबत बोलताना दिनेश लाड म्हणाले की, “मला नाही वाटत की, भारतीय संघाला सरावाचा अधिक त्रास होईल. विराट कोहली आणि रोहित शर्मासारखे खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे या खेळाडूंना इंग्लंडच्या परिस्थितीशी जुळवून घ्यायला जास्त वेळ लागणार नाही.”

तसेच २०११ मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माला स्थान देण्यात आले नव्हते. याबाबत बोलताना ते म्हणाले, “जेव्हा त्याला विश्वचषक २०११ स्पर्धेच्या संघातून वगळण्यात आले; तेव्हा तो खूप दुखावला गेला होता. यानंतर मी त्याला समजावून सांगितले की, त्याने त्याच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. क्रिकेटद्वारेच तो आपला ठसा उमटवू शकतो. त्यावर रोहितने क्रिकेटवर अधिक भर दिला आणि त्याचे फळ आज दिसून येते.”

महत्त्वाच्या बातम्या-

चोवीस वर्षांपूर्वी चेपॉकवर घडलेला इतिहास, भारताविरुद्ध ‘या’ फलंदाजाने केलेली तुफान फटकेबाजी

विश्वचषक खेळलेल्या क्रिकेटपटूची आता झालीय दयनीय अवस्था, पोटासाठी करतोय चक्क सुतारकाम

क्या बात है! स्वत: विराटनेच केली पत्नी अनुष्काच्या ‘त्या’ भूमिकेची प्रशंसा; पाहा काय म्हणाला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---