अफगाणिस्तान संघाला आशिया चषक 2023 स्पर्धेतील महत्त्वाच्या सामन्यात श्रीलंकेकडून 2 धावांनी निराशाजनक पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे अफगाणिस्तानचे स्पर्धेच्या सुपर- 4 फेरीचे तिकीट हुकले. या पराभवानंतर अफगाणिस्तानचे मुख्य प्रशिक्षक जोनाथन ट्रॉट यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे, की त्यांच्या संघाला सुपर- 4 फेरती पोहोचण्यासाठी जे आकडे अखेरच्या काही चेंडूत हवे होते, त्याबाबत त्यांना माहिती नव्हते. ट्रॉट यांच्यानुसार, त्यांच्या संघासोबत याबाबत कोणतीही माहिती शेअर करण्यात आली नव्हती.
नेमकं काय झालं?
झालं असं की, अफगाणिस्तान (Afghanistan) संघाला सुपर- 4 (Super- 4) फेरीत पोहोचण्यासाठी श्रीलंकेविरुद्ध मोठा विजय मिळवण्याची गरज होती. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 291 धावा केल्या होत्या. हे आव्हान अफगाणिस्तानला 37.1 षटकात पार करायचे होते. कारण, तेव्हाच ते सुपर- 4 फेरीत पोहोचू शकले असते. मात्र, संघाने हे अशक्य कार्य जवळपास पूर्ण केले होते. मात्र, अखेरच्या काही चेंडूंवर झालेल्या चुकांमुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
काय म्हणाले प्रशिक्षक?
संघाचे मुख्य प्रशिक्षक जोनाथन ट्रॉट (Jonathan Trott) यांच्या मते, त्यांना 37.1 षटकानंतरच्या आकड्यांविषयी काहीच सांगितले गेले नव्हते. ते म्हणाले, “आम्हाला या आकड्यांविषयी काहीही सांगितले गेले नाही. आम्हाला फक्त एवढंच सांगितलं होतं की, 37.1 षटकात सामना जिंकायचा आहे. आम्हाला हे माहिती नव्हते की, 295 आणि 297पर्यंत जाऊनही आम्ही सुपर-4 फेरीपर्यंत पोहोचू शकतो.”
Afghanistan head coach Jonathan Trott said – "We were never communicated those calculation. We weren't told what the overs in which we could get 295 or 297 That Afghanistan win in 38.1 overs was never communicated to us". (On Yesterday match's equation vs Sri Lanka) pic.twitter.com/ruTMjcoTZH
— Tanuj Singh (@ImTanujSingh) September 6, 2023
पुढे बोलताना ते म्हणाले, “38व्या षटकातही आम्ही क्वालिफाय करू शकत होतो. याबाबत कोणीही आम्हाला कसलीच माहिती दिली नव्हती.”
सामन्यात काय घडलं?
अफगाणिस्तान संघाची धावसंख्या 37 षटकांनंतर 8 बाद 298 इतकी होती. याचा अर्थ असा की, त्यांना विजयासाठी एका चेंडूत 3 धावांची गरज होती. मात्र, मुजीब उर रहमान पहिल्या चेंडूवर बाद झाला होता. यानंतर अफगाणिस्तानला वाटले की, ते सामना जिंकूनही क्वालिफाय करू शकणार नाहीत. कारण, 37.1 षटके झाली होती. मात्र, असे नव्हते. जर संघाने 37.2 षटकात 293 किंवा 37.3 षटकात 294 किंवा 37.5 षटकात 295 धावा केल्या असत्या, तरीही ते सुपर-4 मध्ये गेले असते. मात्र, अफगाणिस्तानने आधीच गुडघे टेकले आणि त्यांनी पुन्हा प्रयत्न केला नाही. त्यामुळे त्यांचे आशिया चषकाच्या सुपर- 4 फेरीत पोहोचण्याचे स्वप्न भंगले. (coach jonathan trott admits afghanistan were unaware of exact equation amid loss to sri lanka read here)
हेही वाचाच-
नाद करा पण श्रेयंकाचा कुठं! महिलांच्या CPL स्पर्धेत ‘अशी’ कामगिरी करताच बनली पहिली भारतीय, सर्वांना पछाडलं
विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाने संघ तर निवडला, पण ‘या’ दिग्गज क्रिकेटर्सच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह कायम