---Advertisement---

‘विश्वातील सर्वात वेगवान माणूस’, अधिक वजनामुळे त्या सुरक्षारक्षकाला समालोचकानेच केले ट्रोल; पाहा व्हिडिओ

On: शुक्रवार, नोव्हेंबर 27, 2020 4:43 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला वनडे सामना शुक्रवारी (27 नोव्हेंबर) सिडनी क्रिकेट स्टेडीयममध्ये खेळला गेला. या सामन्यात नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, सामना सुरळीतपणे सुरु असतानाच मैदानात एक आदोलनकर्ता शिरला.

त्या आंदोलनकर्त्याच्या हातात एक बोर्ड होता. तो क्वीन्सलँडमधील वादग्रस्त खाण प्रकल्पासाठी अडाणी ग्रुपला 1 अब्ज डॉलर्सचे कर्ज देण्याच्या निषेधार्थ मैदानात आला होता.

सामन्याचे थेट प्रक्षेपण होत असतानाच हा आंदोलनकर्ता मैदानात शिरल्यामुळे सुरक्षारक्षकांची तारांबळ उडाली. त्याला मैदानाबाहेर काढण्यासाठी काही सुरक्षारक्षकांनी धाव घेतली. मात्र एक सुरक्षारक्षक लठ्ठ होता. अधिक वजनामुळे त्याला धावताही येत नव्हते. त्यामुळे तो चालत होता. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

सामन्यादरम्यान एरा समालोचकाने या सुरक्षारक्षकाचा उल्लेख ‘विश्वातील सर्वात वेगवान माणूस’ असा केला.

याचवेळी या कोरोनाच्या संकटकाळातही अशी घटना घडल्याने सध्या सिडनी क्रिकेट ग्राऊंडच्या सुरक्षा यंत्रणेवर टीका होत आहे.

क्विन्सलँड येथे अडाणी ग्रुपचा खाण प्रकल्प सुरु आहे. या प्रकल्पासाठी भारतीय स्टेट बँकेने 1 अब्ज डॉलर्सचे कर्ज अडाणी ग्रुपला देण्याचे मान्य केले आहे. मात्र पर्यावरण संवर्धानाच्या दृष्टीने या प्रकल्पाला ऑस्ट्रेलियातून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. भारतीय स्टेट बँकेने १ अब्ज डॉलर्सचे कर्ज देण्याच्या निषेधार्ध अंदोलनेही ऑस्ट्रेलियात झाली आहेत

महत्त्वाच्या बातम्या –

वॉर्नर-फिंच जोडीची कमाल! भारताविरुद्ध केलाय मोठा पराक्रम

अरेरे! भारतीय गोलंदाजांची पिसं काढत ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी रचला ‘हा’ विक्रम

भारतीय संघाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘भारत आर्मी’ पोहचली सिडनीत, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---