क्रिकेट विश्वातील बलाढ्य संघांच्या यादीत भारतीय संघाची गणना होते. सचिन तेंडुलकर, विराट कोहली यासारखे दिग्गज फलंदाज या संघाने जगाला दिले.गोलंदाजीबद्दल बोलायचे, तर अनिल कुंबळे, जहीर खान, जवागल श्रीनाथ या माजी दिग्गज गोलंदाजांनीही आपल्या कामगिरीमुळे अनेक मैदाने गाजवली. त्याचबरोबर जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी हे आनुधिक काळातील उच्च दर्जाचे गोलंदाजही भारतीय संघात आहेत. त्यामुळे या संघाविरुद्ध सातत्याने धावा करणे कोणत्याही फलंदाजासाठी फार अवघड आहे.
उत्कृष्ट गोलंदाजांचा भरणा असूनही काही फलंदाजांनी भारतीय संघाविरुद्ध सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. या फलंदाजांमध्ये ऍरॉन फिंच आणि डेविड वॉर्नरचाही समावेश आहे. या दोघांनी शुक्रवारी (27 नोव्हेंबर) भारताविरुद्ध खेळताना दी़डशतकी भागीदारी रचली. याबरोबर भारताविरुद्ध सलामीला भागीदारी करताना 1000 धावांचा टप्पाही पार केला. हा टप्पा पार करणारी ही चौथी जोडी ठरली.
या लेखात आपण अशा सलामीवीर जोड्यांबद्दल माहिती पाहाणार आहोत ज्यांनी भारतीय संघाविरुद्ध वनडेत सलामीला भागीदारी करताना सर्वाधिक धावा केल्या आहेत.
4) गिलख्रिस्ट -हेडन
ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज सलामीवीर मॅथ्यू हेडन आणि ऍडम गिलख्रिस्ट या जोडीने भारतीय संघाविरुद्ध सलामीला भागीदारी करताना 1035 धावा केल्या आहेत. त्यानी एकूण 23 डावात ही कामगिरी केली आहे.
3) फिंच-वॉर्नर
ऍरॉन फिंच आणि डेविड वार्नर हे ऑस्ट्रेलिया संघाचे आधुनिक काळातील सलामीवीर फलंदाज आहेत. ही जोडी 13 डावात भारताविरुद्ध सलामीला आली आहे. यामध्ये त्यांनी एकत्र मिळून 1113 धावा कुटल्या आहेत.
2) बून-मार्श
डेविड बून आणि जोफरी मार्श ही ऑस्ट्रेलिया क्रिकेटमधील 90 च्या दशकातील सलामीवीर जोडी होती. या जोडीने भारताविरुद्ध खेळलेल्या 21 डावात सलामीला भागीदारी करताना तब्बल 1244 धावा ठोकल्या.
1)ग्रिनीज – हेन्स
गॉर्डन ग्रिनीज आणि डेस्मंड हेन्स हे दोघेही वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचे नावाजलेले सलामीवीर होते. ग्रिनीज – हेन्स या जोडीने भारताविरुद्ध खेळाल्येल्या 22 डावात एकत्र फलंदाजी करताना सर्वाधिक 1407 धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
अरेरे! भारतीय गोलंदाजांची पिसं काढत ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी रचला ‘हा’ विक्रम
भारतीय संघाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘भारत आर्मी’ पोहचली सिडनीत, पाहा व्हिडिओ
‘या’ गोष्टीमुळे भारतीय संघात आत्मविश्वास; सिडनीत मागील पाचही वनडे सामन्याचा काय आहे निकाल पाहा