कॉमनवेल्थ गेम्स २०२२ पूर्वी भारतीय महिला क्रिकेट संघासाठी आनंदाची बातमी आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध २९ जुलै रोजी होणाऱ्या पहिल्या सामन्यापूर्वी भारतीय संघाची सलामीवीर एस मेघना ही कोरोना संक्रणातून बरी झाली असून तिने बर्मिंघमसाठी उड्डाणदेखील भरली आहे. मेघनाला कोरोना संक्रमण झाले होते. यामुळे ती भारतीय संघासोबत इंग्लंडला जाऊ शकली नव्हती. परंतु आता तिने कोरोनावर मात केली असल्याने तिने इंग्लंडचे विमान पकडले आहे. असे असले तरीही, तिला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात संधी दिली जाण्याची शक्यता फार कमी आहे.
मेघनाबरोबरच (S Meghana) गोलंदाज पूजा वस्त्राकार हीदेखील कोरोना संक्रमित झाली होती. मात्र तिच्या तब्येतीबद्दल अद्याप कोणतेही अपडेट पुढे आले नाहीत.
मागील आठवड्यात मेघना आणि पूजा यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह (Covid Positive) आला होता. त्यानंतर त्यांना बेंगलोर येथे आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले होते. त्यावेळी बेंगलोरमध्ये भारतीय महिला संघाचा कॉमनवेल्थ गेम्ससाठी शिबीर सुरू होता. आता कोरोनाविरुद्धची लढाई जिंकल्यानंतर मेघना गुरुवारी (२८ जुलै) बर्मिघमसाठी रवाना (S Meghana Left For Birmingham) झाली आहे. याचे फोटो तिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत.
कॉमनवेल्थ गेम्ससाठी एका संघात १५ खेळाडूंची मर्यादा आहे. त्यामुळे भारतीय संघासोबतही १५ खेळाडूच बर्मिंघमला गेल्या आहेत. याच कारणामुळे रिझर्व खेळाडू पूनम यादव, सिमरन दिल बहादुर आणि ऋचा घोष यांना भारतातच थांबावे लागले आहे.
कॉमनवेल्थ गेम्समध्ये सहभागी होण्याची ही भारतीय संघाची पहिलीच वेळ आहे. या स्पर्धेतील सर्व सामने बर्मिंघमच्या ऍजबस्टन मैदानावर खेळले जाणार आहेत. २९ जुलै रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला सामना खेळल्यानंतर ३१ जुलैला भारतीय संघ पाकिस्तान संघाशी भिडेल. पुढे ३ ऑगस्ट रोजी बार्बाडोस संघाविरुद्ध भारत शेवटचा साखळी फेरी सामना खेळेल. साखळी फेरीतील २ ते ३ सामने जिंकणारे संघ उपांत्य सामन्यात प्रवेश करतील.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
CWG 2022: बर्मिंघममधून भारतीय क्रीडाप्रेमींसाठी चिंतेची बातमी; पदकाची दावेदार कोरोनाबाधित?