पाकिस्तान सुपर लीग सहाव्या हंगामातील अंतिम सामना गुरुवारी(24 जून) झाला. या अंतिम सामन्यात मुलतान सुलतान आणि पेशावर जाल्मी हे दोन संघ आमने-सामने होते. या सामन्यांमध्ये मुलतान सुलतानने पेशावर जाल्मी या संघाचा पराभव केला आणि पाकिस्तान सुपर लीगचा पहिला किताब जिंकला.
पण तुम्हाला हे माहिती आहे का की, आयपीएल आणि पीएसएल या दोन्ही स्पर्धेमध्ये खेळाडूंना पुरस्कार स्वरूपात किती मानधन दिले जाते. चला तर आज आपण या लेखांमध्ये आयपीएल आणि पीएसएलमधील खेळाडूंना मिळणाऱ्या पुरस्कार स्वरूपात मिळणाऱ्या मानधनाची तुलना करुया.
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीगच्या विजेत्या संघाला 20 करोड रुपये पुरस्काराच्या स्वरूपात मानधन मिळते. तर उपविजेत्या संघाला 12.5 करोड रुपये इतके पुरस्काराच्या स्वरूपात मानधन मिळते. परंतु मागील वर्षी कोरोना महामारी दरम्यान नफा कमी झाल्यामुळे पुरस्कार स्वरूपात मिळणाऱ्या मानधनातील रक्कम कमी करण्यात आली होती. या वर्षीच्या हंगामात देखील असेच पाऊल उचलण्याची शक्यता आहे. तसेच मालिकावीर पुरस्कार जिंकणाऱ्या खेळाडूला 10 लाख रुपये बक्षीस मिळतात. त्याचबरोबर सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूला प्रत्येकी 10 लाख रुपये मिळतात.
पाकिस्तान सुपर लीग
पाकिस्तान सुपर लीग 2021 च्या हंगामामध्ये खेळाडूंना वेगवेगळ्या मापदंडाच्या आधारे पुरस्कार स्वरूपात मानधन दिले आहे. पीएसएलमध्ये टी 20 लीग स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक यांना देखील पुरस्कार देण्यात आला आहे. स्पिरिट ऑफ क्रिकेट अवॉर्ड देखील मानधन स्वरूपात पुरस्कार दिला आहे. तसेच पीएसएलमध्ये विजेत्या संघाला 3.5 कोटी रुपये मिळाले. तर, उपविजेत्या संघाला 1.5 कोटी रुपये मिळाले. तसेच मालिकावीर ठरणाऱ्या खेळाडूला पीएसएलमध्ये 14.1 लाख रुपये बक्षीस मिळतात. त्याचबरोबर सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूला प्रत्येकी 3.75 लाख रुपये मिळतात.
सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक :- 3.75 लाख
सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक :- 3.75 लाख
स्पिरिट ऑफ क्रिकेट अवॉर्ड :-15.01 लाख
आयपीएलमध्ये स्पिरिट ऑफ क्रिकेट अवॉर्ड दिला जातो. परंतु पुरस्कार स्वरूपात मानधन दिले जात नाही.
मुलतान सुलतानला विजेतेपद
गुरुवारी पाकिस्तान सुपर लीगचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यांमध्ये मुलतान सुलतान संघाने पेशावर जाल्मी संघाला 47 धावांनी पराभूत केले. त्याचबरोबर मुलतान सुलतान या संघाने मोहम्मद रिजवानच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा पाकिस्तान सुपर लीगचा किताब मिळविला आहे. मुलतान सुलतान या संघाकडून शोएब मकसूद आणि रीली रोसोउ या दोघांच्या फलंदाजीने मैदानावर धुमाकूळ घातला होता. त्यांच्या जबरदस्त खेळीने संघाला 206 धावांवर पर्यंत पोहचवले. हे लक्ष्य साध्य करत पेशावर जाल्मी संघाने फक्त 159 धावा केल्या. त्यामुळे मुलतान सुलतान संघ 47 धावांनी विजयी झाला.
महत्त्वाच्या बातम्या –
“रिषभ पंतच्या रुपात भारताला मिळालाय सुपरस्टार, त्याला बदलू नका”
श्रीलंका दौऱ्यात चमकले नाही तर ‘या’ खेळाडूंना संघातून मिळू शकतो नारळ






