---Advertisement---

सुपर-8 सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या चिंतेत वाढ; सरावादरम्यान स्टार खेळाडूला दुखापत

On: मंगळवार, जून 18, 2024 3:45 PM
---Advertisement---

टी20 विश्वचषक 2024 मध्ये भारतीय संघाचा सुपर-8 मधील पहिला सामना 20 जून रोजी अफगाणिस्तान विरुद्ध होणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे. जागतील टी20 मधील नंबर-1 खेळाडू सूर्यकुमार यादवला 17 जून रोजी बारर्बाडोस येथील ब्रिजटाउन मध्ये सराव सत्रादरम्यान दुखापत झाली आहे. नेटमध्ये फलंदाजी करताना स्टार फलंदाज सुर्याच्या हाताला दुखापत झाली. आता त्याच्या दुखापतीचे अपडेट समोर आले आहे.

वास्तविक, सुर्यकुमार यादवला भारतीय संघाच्या सराव सत्रावेळी फलंदाजी करताना हाताला दुखापत झाली आहे. तथापि, सूर्याने हा दुखापत आत्मसात केला आणि फिजिओचे लक्ष वेधून घेत फलंदाजी सुरु ठेवली. सुर्याने फलंदाजीचे सत्र पूर्ण करताच. यानंतर फिजिओने लावलेल्या स्प्रेनंतर तो फलंदाजी करताना दिसला. त्याची दुखापत गंभीर आहे की नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

टीम इंडिया यंदाच्या विश्वचषकात कॅरेबियन देशातील बारर्बाडोस येथे पहिल्यांदाच सरावासाठी उतरली होती, या दरम्यान नेट्स मध्ये सुर्याच्या हातास दुखापत झाली. त्यामुळे भारतीय संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे. टी20 क्रमवारीत पहिल्या स्थानी असलेल्या सुर्यकुमार यादव टीम इंडियासाठी सुपर-8 मध्ये महत्तवाची भूमिका बजावू शकतो. याचा नमूना सुर्यकुमार यादवने अमेरिकेविरुद्ध फलंदाजी करुन सादर करत भारतीय संघास विजय मिळवून दिला होता. अश्या स्थितीत भारतीय संघास सुपर-8 मधील सामन्यांसाठी संघात असणे गरजेचे आहे.

टीम इंंडियाचा 20 जून रोजी अफगाणिस्तान विरुद्ध सुपर-8 मधील पहिला सामना रंगणार आहे. तर 22 जून रोजी भारत-बांग्लादेश आमने-सामने असतील तर शेवटचा सामना 24 जून रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार आहे.

महत्तवाच्या बातम्या-

पाकिस्तानी क्रिकेटपटूची भररस्त्यात सटकली, थेट चाहत्यावरच गेला धावून; VIDEO व्हायरल
भारतासह हे 12 संघ टी20 विश्वचषक 2026 साठी पात्र; सुपर-8 साठी पात्र न झालेल्या पाकिस्तानचं भविष्य काय?
भारतीय संघात कुलदीप यादवला संधी मिळाल्यास कोणत्या खेळाडूचा होणार पत्ता कट?

 

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---