जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) नव्याने खेळाडूंची वैयक्तिक कसोटी क्रमवारीत जाहीर केली आहे. या ऐतिहासिक सामन्यानंतर भारताच्या खेळाडूंना या क्रमवारीत अधिक नुकसान झाले तर, न्यूझीलंडच्या खेळाडूंना या विजेतेपदानंतर वैयक्तिक क्रमवारीत देखील लाभ झाला आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन याने ऑस्ट्रेलियाच्या स्टीव स्मिथ याला हटवत पुन्हा एकदा फलंदाजांच्या क्रमवारीत शीर्षस्थान गाठले.
आयसीसीने जाहीर केली नवी क्रमवारी
आयसीसीने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपनंतर कसोटी खेळाडूंची नवी क्रमवारी जाहीर केली आहे. कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने या सामन्याआधी गमावलेले पहिले स्थान पुन्हा एकदा काबीज केले. भारताचा सलामीवीर रोहित शर्माला एका स्थानाचा फायदा होऊन तो सहाव्या स्थानी पोहोचला.
दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉक हा न्यूझीलंडच्या हेन्री निकोल्सला मागे सोडत नवव्या क्रमांकावर आला. अंतिम सामन्यात भारतातर्फे सर्वाधिक धावा काढणारा उपकर्णधार अजिंक्य राहणे याला क्रमवारीत दोन स्थानाचा फायदा झाला व तो तेराव्या क्रमांकावर पोहोचला.
जेमिसन आणि कॉनवेची भरारी
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात दोन्ही डावात मिळून ७ बळी मिळवणाऱ्या सामनावीर कायले जेमिसनने कारकिर्दीतील सर्वोत्तम १३ वे स्थान पटकावले. न्यूझीलंडसाठी आतापर्यंत केवळ तीन कसोटी सामने खेळणाऱ्या सलामीवीर डेवॉन कॉनवेला या क्रमवारीत जबरदस्त फायदा झाला. त्याने ६१ व्या क्रमांकावरून ४३ व्या क्रमांकावर झेप घेतली.
भारताचा प्रमुख अष्टपैलू रवींद्र जडेजा याला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातील अपयश भोवले. त्याची अष्टपैलूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली. याव्यतिरिक्त चेतेश्वर पुजारा व जसप्रीत बुमराह या प्रमुख भारतीय खेळाडूंना देखील नुकसानाचा सामना करावा लागला. पुजारा १६ व्या स्थानी तर बुमराह १९ व्या स्थानी घसरला.
महत्त्वाच्या बातम्या –
ओहो… क्या बात है! पराभवाची पर्वा न करत किंग कोहली अनुष्कासोबत लुटतोय ‘या’ गोष्टीचा आनंद
अजबच! WTC फायनलचं टेंशन घेऊन चक्क बाथरुममध्ये लपला होता जेमिसन, वाचा मजेदार किस्सा
अरेरे! २४ वर्षीय क्रिकेटपटूचं फुटकं नशीब, बड्डे दिवशी पदार्पण केलं; पण शून्यावर तंबूत परतला