---Advertisement---

Video: तिसऱ्या वन-डेसाठी ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूने केला धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटचा सराव

On: बुधवार, जानेवारी 16, 2019 8:29 PM
---Advertisement---

एडलेड येथे झालेल्या दुसऱ्या वन-डे सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्सने विजय मिळवला. तर ऑस्ट्रेलियाने सिडनी वन-डे सामना 34 धावांनी जिंकला होता. यामुळे दोन्ही संघ तीन सामन्यांच्या वन-डे मालिकेत 1-1 असे बरोबरीत आहेत.

तिसरा आणि शेवटचा वन-डे सामना 18 जानेवारीला मेलबर्न येथे होणार असून दोन्ही संघ हा सामना जिंकण्याच्या प्रयत्नात असतील. यासाठी ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलने सरावाला सुरूवातही केली आहे.

cricket.com.au ने मॅक्सवेलचा एक व्हिडियो ट्विट केला आहे. यामध्ये तो वेगवेगळ्या क्रिकेटपटूंचे शॉट्स हुबेहूब खेळताना दिसला. यात त्याने भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज एमएस धोनीचा हेलिकॉप्टर शॉटलाही कॉपी केले.

धोनी बरोबरच मॅक्लवेलने ऑस्ट्रेलियाचे दिग्गज खेळाडू रिकी पॉंटींग, मार्क वॉ , इंग्लंडचा केविन पीटरसन आणि दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स यांचे शॉट्सचेही हुबेहूब खेळण्याचा प्रयत्न केला आहे.

यावेळी मॅक्सवेलला धोनीने त्याच्या गोलंदाजीवर मारलेल्या हेलिकॉप्टर शॉटची आठवण आली. धोनीने त्याला 115 मीटरचा षटकार मारला होता.

मॅक्सवेलने सुरू असलेल्या वन-डे मालिकेत अनुक्रमे 11 आणि 48 धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

ऑस्ट्रेलियन मीडियाने धोनीला केले ट्रोल, चाहत्यांनीही उडविली खिल्ली

तर आणि तरच विराट करणार १०० आंतरराष्ट्रीय शतकं

झहीरबरोबर १५ दिवसांचा सराव या टीम इंडियाच्या सदस्यासाठी ठरला टर्निंग पाॅईंट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment