कोरोना व्हायरसमुळे क्रिकेटवर मोठा परिणाम झाला आहे. या व्हायरसमुळे सामने रद्द किंवा स्थगित करण्यात आले आहेत. त्यामुळे खेळाडूंना पर्याय नसल्यामुळे घरात विश्राम करत आहेत. परंतु एक क्रिकेट संघ असाही आहे ज्यांच्या खेळाडूंंना कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. तो संघ म्हणजेच झिंबाब्वे.
झिंबाब्वे संघासाठी पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय वेळापत्रक हे खूप व्यस्त होते. परंतु कोरोना व्हायरसमुळे सर्व खराब झाले. झिंबाब्वे संघाच्या मुख्य फलंदाज ब्रेंडन टेलर (Brendan Taylor) यावेळी म्हणाला की, “हे खूप निराशाजनक आहे. वैयक्तिररित्या पाहिलं तर याचा कोणताच फायदा मिळणार नाही.”
टेलर पुढे म्हणाला की, “मला वाटते की, झिंबाब्वे (Zimbabwe) संघाला जास्तीत जास्त सामने खेळण्याची आवश्यकता आहे. आमच्याकडे क्रिकेटच्या सामन्यांची नेहमी कमतरता असते. परंतु यावर्षी आमचे आंतरराष्ट्रीय वेळापत्रक (International Timetable) व्यस्त होते. या व्हायरसमुळे सर्वच अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे आम्ही खूप वाईट वाटत आहे.”
टेलर पुढे म्हणाला की, “या व्हायरसमुळे अनेक लोकांनी आपली जीव गमावला आहे. त्याच्या नातेवाईकांमधील लोकांचाही मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता क्रिकेट जास्त महत्त्वाचे नाही. तसं पाहिलं तर आंतरराष्ट्रीय खेळाडूंना कोटी रुपयांपर्यंत पगार मिळतो. तर झिंबाब्वे संघाचे खेळाडू पगार मिळण्यासाठी वाट पाहतात.”
झिंबाब्वे क्रिकेट बोर्ड (Zimbabwe Cricket Board) बर्याच वर्षांपासून आर्थिक संकटाशी झगडत आहे. या कारणास्तव, त्यांच्या खेळाडूंना दोन-तीन महिने पगारही मिळत नाही.
ट्रेंडिंग घडामोडी-
-रोहित जेव्हाही ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळतो तेव्हा त्यांना नडतोच
-३ अशा चुका, ज्यामुळे विश्वचषकात भारताला झालेत मोठे तोटे
-चाहत्याने थेट क्रिकेटरला विचारले, तुमच्या मुलीशी लग्न करायचे आहे? क्रिकेटपटूने दिले असे काही उत्तर