---Advertisement---

अवघ्या 7 धावांवर 6 विकेट्स गमावूनसुद्धा जिंकला सामना, ऍलिस्टर कुकच्या संघाचा दारूण पराभव

On: गुरूवार, सप्टेंबर 22, 2022 5:24 PM
Lancashire
---Advertisement---

इंग्लंडच्या काउंटी क्रिकेट चॅम्पियनशीप डिवीजन 1चे सामने सुरू आहेत. यावेळी इसेक्स आणि लंकाशायर यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. याचे कारण म्हणजे दुसऱ्या डावात 7 धावांवर 6 विकेट्स गमावून सुद्धा लंकाशायरने सामना 38 धावांनी जिंकला आहे.

लंकाशायर त्यांच्या पहिल्या डावात दिडशेच्या आतच सर्वबाद झाला. यावेळी संघाकडून एकही फलंदाज खेळपट्टीवर अधिक काळ टिकला नाही. एवढेच नाही तर एकाही खेळाडूने 30 धावांपर्यंतही धावसंख्या केली नाही. यामुळे संघ केवळ 131 धावसंख्याच उभारू शकला. एसेक्सकडून सिमॉन हारमर याने 5 विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात इसेक्सचा संघही 107 धावांवरच गारद झाला. यावेळी सर ऍलिस्टर कुक (Sir Alastair Cook) याने सर्वाधिक धावा (40) केल्या. यामुळे लंकाशायरला 24 धावांची आघाडी मिळाली. तर टॉम बेली याने पाच विकेट्स घेतल्या.

दुसरा डाव सुरू झाला असता लंकाशायरची पुन्हा एकदा अडखळत सुरूवात झाली. संघाने केवळ 7 धावसंख्येपर्यंत 6 विकेट्स गमावल्या होत्या. अशी स्थिती असून सुद्धा संघाने 73 धावा केल्या. इसेक्सकडून शेन स्नॅटर याने 6 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. यासाठी त्याने 8 षटकात 10 धावा दिल्या. यातील दोन षटके निर्धाव टाकली.

98 धावाच्या लक्ष्याचा पाठलाग करताना संघ 59 धावांवरच सर्वबाद
इसेक्सला सामना जिंकण्यासाठी 98 धावांचे लक्ष्य होते. यामुळे संघ सहजच सामना जिंकेल अशी अपेक्षा होती, मात्र असे झाले नाही. लंकाशायरच्या गोलंदाजांनी दुसऱ्या डावातही उत्तम कामगिरी केली. त्यांनी इसेक्सच्या फलंदाजांना 59 धावांतच तंबूचा रस्ता दाखवला. यावेळी पुन्हा एकदा कुकने इसेक्सकडून सर्वाधिक अशा 14 धावा केल्या, तर टॉम वेस्टले याने 13 धावा केल्या. यावेळी त्यांच्या बाकी फलंदाजांना दुहेरी धावसंख्या करता आली नाही आणि 4 फलंदाज शून्यावरच बाद झाले. या डावात जॉर्ज बाल्डरसन याने 5 आणि विल विलियम्स याने 4 विकेट्स घेतल्या.

https://twitter.com/lancscricket/status/1572668886188961793?s=20&t=3f1w8skUdyIForG2oTcFjg

विशेष म्हणजे हा सामना 750 चेंडूतच संपला. प्रथम श्रेणीमधील 2006 नंतर हा सर्वात जलद निकाली लागलेला सामना ठरला ज्यामध्ये 40 विकेट्स पडल्या.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नागपूरात पोहोचताच विराट धडकला शार्कच्या घरी! फोटोच्या कॅप्शनने वेधलेय लक्ष
गुजरात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत अर्जुन कढे, ऋतुजा भोसले हे महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करणार
फिफा अंडर-17 वुमन्स वर्ल्ड कप इंडिया2022 स्पर्धेच्या यजमान शहराच्या लोगोचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्ते अनावरण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---