भारतातील कुस्ती क्षेत्रात फोगट कुटुंब प्रसिद्ध आहे. मात्र आता याच कुटुंबाला एका दुर्दैवी घटनेमुळे दु:खाचा सामना करावा लागत आहे. भारताच्या स्टार कुस्तीपटू गीता आणि बबीता फोगट यांची आतेबहिण रितिका हीने आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे. कुस्तीच्या अंतिम सामन्यात झालेला पराभव सहन करता न आल्याने तिने हे धक्कादायक पाऊल उचलल्याचे म्हटले जात आहे.
१७ वर्षीय रितिकालाही फोगट बहिणींप्रमाणे कुस्तीपटू बनायचे होते. त्यासाठी ती ५ वर्षे आपले मामा महावीर फोगट यांच्या अकादमीमध्ये सराव करत होती. तिने नुकत्याच १२ ते १४ दरम्यान भरतपूरमधील लोहागढ स्टेडियममध्ये झालेल्या राज्यस्थरीय सब-ज्यूनियर आणि ज्यूनियर महिला आणि पुरुष कुस्ती स्पर्धेत सहभाग घेतला होता.
या स्पर्धेत ती अंतिम सामन्यातही पोहचली होती. या सामन्यासाठी महावीर फोगट देखील उपस्थित होते, असे समजत आहे. मात्र अंतिम सामन्यात तिला एका गुणाने पराभवाचा सामना करावा लागला.
हा पराभव रितिकाला सहन झाला नाही. त्यामुळे तिने १५ मार्चला रात्री महावीर फोगट यांच्या गावी बालाली येथील एका खोलीत पंख्याला ओढणी बांधून फाशी घेतली, असे समोर येत आहे.
तिचा मृतदेह पोस्टमार्टम केल्यानंतर तिच्या नातेवाईकांकडे सुपूर्त करण्यात आला असून तिच्यावर अंतिम संस्कार तिच्या गावी राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील जैतपूरमध्ये करण्यात आले.
या प्रकरणाबद्दल डिएसपी राम सिंग यांनी सांगितले आहे की पोस्टमार्टमनंतर तिचा मृतदेह नातेवाईकांकडे सोपवण्यात आला आहे. तसेच त्यांना ती अंतिम सामन्यात पराभूत झाल्याची माहिती नातेवाईकांनी दिली असून आता या प्रकरणाची चौकशी पोलिस करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
‘तो’ धक्कादायक व्हिडिओ पाहून हरभजन सिंग भडकला; म्हणाला, ‘अशा मुलांना जगण्याचा अधिकार नाही’
गचाळ क्षेत्ररक्षणानंतर शार्दुलवर विराटचा चढला पारा, व्हिडिओ होतोय व्हायरल
धक्कादायक! पुणे जिल्ह्यातील कबड्डीपटूंच्या गाडीला मोठा अपघात, दोघांचा जागीच मृत्यू