fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

परदेशात पतीबरोबर फसली भारतीय महिला खेळाडू, महिन्याला एवढी मोठी रक्कम देतीयं घरभाडं

Covid-19 Lockdown Indian Rifle Shooter Ayushi Gupta Stuck in Zambia With Her Husband for over a Month

भारताची रायफल शूटर आयुषी गुप्ता आपले पती सक्षमबरोबर मागील महिन्यापासून झाम्बियामध्ये अडकले आहेत. आयुषी आणि तिचे पती एका व्यावसायिक सहलीसाठी झाम्बियाच्या लुसाका शहरात गेले होते. या दोघांचे जानेवारीमध्ये लग्न झाले होते.

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पहाता सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ते दोघेही येथे अडकले आहेत.

आयुषी आणि सक्षमने २७ मार्चला भारतात परतण्यासाठी तिकीट काढले होते. परंतु भारत सरकारच्या १९ मार्चच्या घोषणेनंतर २२ मार्चला सर्व आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद केल्या होत्या. त्यामुळे या जोडप्याला भारतात येता आले नाही.

एका वृत्तानुसार, भारतात येण्यासाठी कोणत्याही विमानाचे तिकीट न मिळाल्याने हे दांपत्य भारतीय हाय कमिशनकडे मदत मागण्यासाठी पोहोचले. परंतु आतापर्यंत त्यांना कोणतीही मदत मिळू शकली नाही.

२७मार्चला या दोघांचाही व्हिसा रद्द झाल्यामुळे या दोघांनाही तात्पुरत्या वास्तव्यासाठी परवाना घेऊन सर्व्हिस अपार्टमेंटमध्ये रहावे लागत आहे. यासाठी तब्बल २.५ लाख खर्च दर महिना येत आहे.

लुसाकामध्येही कोरोना व्हायरसची प्रकरणे वाढत आहेत. तसेच या व्हायरसची शनिवारी जवळपास १० प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे या दांपत्यांची चिंता वाढत आहे.

आयुषीने (Ayushi Gupta) एका मुलाखतीत म्हणाली की, “आम्ही यापूर्वी तिकीट घेण्याचा प्रयत्न केला. परंतु भारतात परतण्यासाठी कोणतेही तिकीट मिळाले नाही. सर्व विमाने आधीपासूनच आरक्षित करण्यात आली होती.”

आयुषीने पुढे सांगितले की, “येथे कोरोना व्हायरसची (Corona Virus) प्रकरणे वाढत आहेत. आम्हाला एका वाहनचालकाने सांगितले की, लुसाकामध्ये जे काही प्रकरणे सांगितली जात आहेत. त्यापेक्षाही कितीतरी जास्त प्रकरणे आहेत. आम्हाला येथील वैद्यकीय सुविधांबद्दल माहिती नाही. आम्ही घरातील वस्तूं आणण्यासाठी खूप धोका पत्करून बाहेर पडतो. जर आम्हाला या व्हायरसची लागण झाली तर काय होईल? त्यामुळे आम्हाला खूप भिती वाटत आहे.”

“हाय कमिशन, परराष्ट्र मंत्रालय आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) या सर्वांना खूप सारे मेल आणि रिमाईंडर्स पाठवले आहेत. परंतु त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे उत्तर मिळू शकले नाही,” असेही आयुषी पुढे म्हणाली.

ज्यूनियर शूटींग विश्व चषक आणि जागतिक विद्यापीठ शूटींग खेळात आयुषीने भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच आयुषी राष्ट्रीय शूटींग स्पर्धेत उत्तर प्रदेशचे प्रतिनिधित्व करते.

ट्रेंडिंग घडामोडी-

-खराब खेळपट्टीमुळे रद्द केलेले ३ आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने, २ आहेत भारतातील

-पाकिस्तानच्या खेळाडूला टीम इंडियाचं कोच बनून करायचं आहे हे काम

-क्रिकेट इतिहासात सर्वात वेगवान चेंडू टाकणारे ३ गोलंदाज

You might also like