सीपीएल २०२० मधील तिसरा सामना दोन वेळचा विजेता जमैका तल्लावाज विरुद्ध सेंट लुसिया झुक्स या दोन संघांदरम्यान होणार आहे. प्रसिध्द व बलाढय खेळाडूंची फौज घेऊन जमैका तल्लावाज, नवोदित कर्णधार रोवमन पॉवेल यांच्या नेतृत्वात मैदानात उतरेल. पॉवेलच्या साथीला टी२० चे दिग्गज आंद्रे रसेल, मुजीब उर रेहमान, ओशेन थॉमस, कार्लोस ब्रेथवेट हे कोणत्याही क्षणी सामना पालटणारे खेळाडू आहेत.
दुसरीकडे, वेस्ट इंडिजला दोन टी२० विश्वचषक जिंकून देणारा डॅरेन सॅमी सेंट लुसिया झुक्सचे नेतृत्व करेल. सेंट लुसिया झुक्स संघात आंद्रे फ्लेचर, मोहम्मद नबी, झहीर खान, रहकीम कॉर्नवॉल, केस्रिक विल्यम्स यासारखे मातब्बर टी२० खेळाडू आहेत.
जमैका तल्लावाज संभावित ११-
ग्लेन फिलिप्स, चॅडविक वॉल्टन ( यष्टीरक्षक ), जर्मन ब्लॅकवूड, रोवमन पॉवेल ( कर्णधार ), आंद्रे रसेल, कार्लोस ब्रॅथवेट, असिफ अली, ओशेन थॉमस, फिडेल एडवर्डस, मुजीब उर रहमान, संदीप लामिछाने
सेंट लुसिया झुक्स संभावित ११-
आंद्रे फ्लेचर ( यष्टीरक्षक ), रहकीम कॉर्नवॉल, लेनिको बाऊचर, रोस्टन चेज, नजीबउल्ला झादरान, मोहम्मद नबी, डॅरेन सॅमी ( कर्णधार ), केस्रिक विल्यम्स, चिमार होल्डर, ओबेद मेकॉय, झहीर खान
महास्पोर्ट ड्रीम ११
यष्टीरक्षक-
१) आंद्रे फ्लेचर
सीपीएलच्या पहिल्या हंगामापासून सेंट लुसिया संघासोबत असलेला आंद्रे फ्लेचर यष्टीरक्षणासोबतच आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. सीपीएलच्या इतिहासात ख्रिस गेल व लेंडल सिमन्स यांच्यानंतर फ्लेचरच्या नावे सर्वाधिक धावा आहेत.
फलंदाज-
१) ग्लेन फिलिप्स ( उपकर्णधार )
२०१७ मध्ये जमैका तल्लावाजसोबत जोडल्या गेल्यापासून न्यूझीलंडच्या या यष्टीरक्षक फलंदाजाने कमालीचे सातत्य दाखवले आहे. त्याच्याकडे, पहिल्यापासून डाव सावरून धरण्याची क्षमता आहे. तसेच वेळप्रसंगी आक्रमक फटके तो खेळू शकतो. जमैकाच्या संघाचा प्रमुख फलंदाज म्हणून फिलिप्स २०२० मध्ये जबाबदारी पार पाडेल.
२) रॉवमन पॉवेल
जमैका तल्लावाजचे नेतृत्व करत असलेला हा विस्फोटक फलंदाज आपल्या संघाच्या मध्यफळीची धुरा सांभाळेल. ख्रिस गेल, आंद्रे रसेल यांसारख्या ‘जमैकन पावर’ ची झलक पॉवेलने अनेकदा दाखवली आहे. दुबई झालेल्या टी१० स्पर्धेत ४० चेंडूत ८४ व २५ चेंडूत ६१ धावांच्या तुफानी खेळ्या त्याने खेळल्या आहेत.
३) नजीबउल्ला झादरान
अफगाणिस्तानच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेला नजीब आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. लीलया षटकार मारण्याची त्याची क्षमता वाखाणण्याजोगी आहेत. सेंट लुसिया संघाने मागील वर्षीच्या कायम केलेल्या खेळाडूंपैकी तो एक आहे. २०२० सीपीएल हंगाम त्याच्यासाठी तसेच संघासाठी मोठा ठरू शकतो.
४) जर्मन ब्लॅकवूड
फिलिप्स, वॉल्टन, रसेल, ब्रेथवेट यासारख्या तुफानी फलंदाजांमध्ये ब्लॅकवूड जमैका तल्लावाजच्या फलंदाजीची एक बाजू लावून धरू शकतो. जमैका संघातील तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून तो संघासाठी मोलाची कामगिरी या हंगामात बजावेल.
अष्टपैलू
१) आंद्रे रसेल ( कर्णधार )
सध्या टी२० क्रिकेटमधील सर्वोत्तम अष्टपैलू असलेला आंद्रे रसेल या संघाचा कर्णधार असेल. क्रिकेटच्या तीनही क्षेत्रात रसेलचे योगदान बहुमूल्य असते. कोणत्याही क्षणी सामना फिरवायची क्षमता त्याच्यामध्ये आहे.
२) मोहम्मद नबी
अफगाणिस्तानचा हा दिग्गज टी२० स्पेशालिस्ट म्हणून ओळखला जातो. किफायतशीर गोलंदाजी तसेच खालच्या क्रमांकावर येऊन ताबडतोब फलंदाजी करण्यासाठी नबी प्रसिद्ध आहे. आयपीएलसारख्या उच्चस्तरीय स्पर्धेत तो सातत्याने खेळतोय.
३) रहकीम कॉर्नवॉल
सर्वाधिक वजनाचा खेळाडू म्हणून गणला गेलेला रहकीम कॉर्नवॉल एक तडाखेबाज फलंदाज आहे. झुक्स संघाकडून सलामीला येऊन त्याने मागील दोन हंगाम गाजवलेले आहेत. गरज पडल्यास, तो कामचलाऊ ऑफ स्पिन गोलंदाजी करू शकतो.
गोलंदाज-
१) मुजीब उर रहमान
राशिद खानच्या सोबतीने अफगाणिस्तानसाठी आपल्या फिरकीच्या जोरावर अनेक सामने जिंकून देणारा मुजीब हा अव्वल फिरकीपटू आहे. आयपीएल तसेच बिग बॅश लीगचे अनेक सामने मुजीबने एकहाती जिंकून दिले आहेत. मुजीबच्या फिरकीची तोड अजून सापडली नसल्याने तो जमैकासाठी आपला प्रभाव पाडू शकतो.
२) झहीर खान
अफगाणिस्तानचाच चायनामन गोलंदाज झहीर खान सेंट लुसिया संघाचे प्रतिनिधित्व करेल. सेंट लुसिया संघातील प्रमुख गोलंदाज असल्याने तो संपूर्ण हंगामात उपलब्ध असेल. झहीरने सीपीएलसोबत बिग बॅश व इंग्लिश टी२० ब्लास्ट या लीग दोन वर्षापासून गाजवल्या आहेत.
३) ओशेन थॉमस
उंचापुरा, युवा वेस्ट इंडीयन वेगवान गोलंदाज ओशेन थॉमस जमैका तल्लावाजच्या वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करेल. मागील दोन वर्षांपासून थॉमस सीपीएलमधील प्रमुख वेगवान गोलंदाज म्हणून समोर आला आहे. सीपीएल व राष्ट्रीय संघातील कामगिरीमुळे थॉमसची निवड राजस्थान रॉयल्स या आयपीएल संघात केली गेली.