कॅरेबियन प्रीमियर लीग (सीपीएल)2022च्या अंतिम सामन्यात जमैका तल्लावाह्सने बार्बाडोस रॉयल्सचा (Barbados Royals vs Jamaica Tallawahs) 8 विकेट्सने पराभव केला आहे. रोवमन पॉवेल याच्या नेतृत्वाखालील जमैका तल्लावाह्सचा हा तिसरा सीपीएल चषक ठरला आहे. याआधी ते 2013 आणि 2016मध्ये सीपीएलचे चॅम्पियन ठरले होते. अंतिम सामन्यात बार्बाडोस रॉयल्स जिंकणार अशी अपेक्षा केली जात होती, कारण त्यांनी गटामध्ये अव्वल स्थान गाठत बाद फेरीमध्ये प्रवेश केला होता. तर जमैका संघ चौथ्या स्थानावर होता.अंतिम सामन्यात जमैका संघाने अष्टपैलू कामगिरी करत बार्बादोसला पराभूत केले आहे.
प्रोविडन्स स्टेडियम, गयाना येथे खेळल्या गेलेल्या या अंतिम सामन्यात बार्बाडोस रॉयल्सचा कर्णधार काईल मेयर्सने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आझम खान (Azam Khan) याच्या अर्धशतकीय खेळीने त्यांनी 20 षटकात 7 विकेट्स गमावत 161 धावा केल्या. त्याने 40 चेंडूत 51 धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त सलामीवीर रहकीम कॉर्नवाल याने 36 आणि मेयर्सने 29 धावा केल्या. या तीन खेळाडूंशिवाय बाकी कोणताही खेळाडू मोठी खेळी करू शकला नाही. जमैकाची गोलंदाजी जबरदस्त राहिली. फॅबियन ऍलन आणि निकोलस गॉर्डन यांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या.
The Champions of #CPL22! The @JAMTallawahs ! 🏆🇯🇲🐊#BRvJT #CricketPlayedLouder #BiggestPartyInSport #CPLFinal pic.twitter.com/X1Ih8udGMp
— CPL T20 (@CPL) October 1, 2022
लक्ष्याचा पाठलाग करताना जमैकाची वाईट सुरूवात झाली. विकेटकीपर-सलामीवीर केन्नर लुईस गोल्डन डकवर बाद झाला. त्याची विकेट गेल्यावर ब्रेंडन किंग (Brandon King) याने शमराह ब्रूक्स (Shamarh Brooks) याच्यासोबत 58 चेंडूत 86 धावांची भागीदारी केली. ब्रूक्सने 33 चेडूंत 6 चौकार आणि 2 षटकाराच्या साहाय्याने 47 धावा केल्या. किंगने मॅचविनिंग खेळी केली आहे. त्याने 50 चेंडूत 13 चौकार आणि 2 षटकार खेचत नाबाद 83 धावा केल्या. पॉवेलने 13 चेंडूत 14 धावा केल्या. यामध्ये त्याने एक षटकार खेचला.
🏆2013
🏆2016
🏆2022We are the #CPL22 CHAMPIONS 🇯🇲🥳
Tallawahs fans, represent in the comments below 🇯🇲🐊#JamaicaTallawahs #FiWiTallawahs #TallawahsTallawah #CPL22 #CricketPlayedLouder pic.twitter.com/ZJtrSTnq2a
— Jamaica Tallawahs (@JAMTallawahs) October 1, 2022
या सामन्याचा समानावीर फॅबियन ऍलन ठरला. त्याने 4 षटकात 24 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. मालिकावीर ब्रेंडन किंग ठरला. सीपीएलच्या या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये किंग अव्वल स्थानावर आहे. त्याने 12 सामन्यांत 38.36च्या सरासरीने 422 धावा केल्या. यामध्ये त्याचा स्ट्राईक रेट 135.26 राहिला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
T20 World Cup 2022: टीम इंडियामध्ये दोन बदल! वेगवान गोलंदाजांची संघामध्ये एंट्री
विराट कोहली हालवू शकतो टीव्ही चॅनलची टीआरपी! माजी इंग्लिश गोलंदाज केला खुलासा
‘बुमराह वर्ल्डकपमधून बाहेर गेला नाही’; बीसीसीआय अध्यक्षांनी दिली आनंदाची बातमी