लंडन ।कॅरेबियन प्रीमियर लीगचे स्पर्धा जर झालीच तर संपुर्ण आयोजन हे त्रिनिदाद आणि टोबॅगो या देशांमध्ये होण्याचे वक्तव्य सीपीएलचे मॅनेजर मायकल हाॅल यांनी केले आहे. त्रिनिदाद आणि टोबॅगो हे संपूर्णपणे व्हायरसच्या प्रसारावर नियंत्रण ठेवणारे कॅरेबियन बेटांमधील सर्वात यशस्वी देश असल्याचेही मायकल म्हणाले.
“कोरोना व्हायरसचा (Corona Virus) जगभर झालेला प्रसार पाहता, २०२० मध्ये कॅरेबियन प्रीमियर लीग (Caribbean Premier League (CPL)) रिकाम्या स्टेडियममध्ये खेळविण्यात येईल. त्यामुळे आम्हाला स्पर्धा खेळवायची की नाही या कठीण निर्णयाचा सामना करावा लागला,” असेही ते पुढे म्हणाले.
कॅरेबियन प्रीमियर लीग १८ ऑगस्ट ते १० सप्टेंबरदरम्यान सरकारच्या मान्यतेनुसार खेळली जाईल.
“आम्ही स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. मी सल्ला देईल, की स्पर्धेचा कालावधी १ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर असा असेल. ज्यामध्ये पहिला सामना १८ ऑगस्ट रोजी आणि अंतिम सामना १० सप्टेंबरला होईल,” असे हॉल पुढे म्हणाले.