आयपीएल 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध लखनऊ सुपरजायंट्स यांच्या दरम्यान सोमवारी (10 एप्रिल) सामना खेळला गेला. बेंगलोर येथील चिन्नास्वामी स्टेडियम येथे झालेल्या या सामन्यात धावांचा अक्षरशा पाऊस पडला. लखनऊ सुपरजायंट्सने 213 धावांचा यशस्वी पाठलाग करत 1 विकेटने थरारक विजय मिळवला. लखनऊच्या या विजयाचे सर्वात मोठे श्रेय निकोलस पूरन याला दिले गेले. त्याच्या अविश्वसनीय फटकेबाजीने संघाला विजय मिळवता आला. मात्र, त्याच्या या कामगिरीचे श्रेय अनेकांनी लखनऊ संघाचा मेंटर गौतम गंभीरला दिले.
लखनऊ सुपरजायंट्स अडचणीत असताना पूरनने मैदानावर पाऊल ठेवले. त्याने आरसीबीच्या सर्वच गोलंदाजांचा समाचार घेताना त्याने अवघ्या 15 चेंडूवर अर्धशतक पूर्ण केले. यामध्ये 3 चौकार व 6 षटकारांचा समावेश होता. बाद होण्यापूर्वी त्याने 19 चेंडूत 62 धावांची ऐतिहासिक खेळी केली. यामध्ये 4 चौकार व 7 गगनचंबी शेतकऱ्यांचा समावेश होता. आयपीएल इतिहासातील दुसरे सर्वात वेगवान अर्धशतक करण्याचा मान त्याला मिळाला.
पूरन मागील अनेक वर्षापासून आयपीएलमध्ये सहभागी होत आहे. वेस्ट इंडीजचे नेतृत्व देखील त्याने केले असून आयपीएलमध्ये त्याला म्हणावी तशी छाप पडत आली नाही. यापूर्वी मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्स व सनरायझर्स हैदराबाद या संघांसाठी त्याने आपले कौशल्य दाखवलेले. मात्र, एखाद दुसरी खेळी सोडून त्याला विशेष चमक दाखवता आली नाही.
आयपीएल 2023 लिलावात लखनऊने त्याच्यावर तब्बल 16 कोटींची बोली लावली. संघाच्या या निर्णयावर अनेकांनी टीका केली होती. मात्र, मेंटर गौतम गंभीर यांनी त्याच्यामध्ये ती गुणवत्ता असून, या गुणवत्तेसाठी पैसा दिल्याचे म्हटलेले. तो तुम्हाला एकहाती सामने जिंकून देऊ शकतो. गंभीर आणि संघ व्यवस्थापनाने त्याच्यावर टाकलेला विश्वास त्याने सार्थ करून दाखवला असून, सलग दोन विजयात त्याची भूमिका निर्णायक राहिली आहे. लखनऊ संघाच्या पुढील प्रवासात तो किती योगदान देतो हे पाहणे रंजक ठरेल.
(Credit Of Nicholas Pooran Goes To LSG Mentor Gautam Gambhir)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आरसीबी अखेरच्या चेंडूवर पराभूत! लखनऊ सुपरजायंट्सने पार केले 213 धावांचे आव्हान, पूरन-स्टॉयनिस ठरले नायक
धोनीची स्टाईल मारायला निघालेला कार्तिक, पण शेवटच्या चेंडूवर बिघडवला सगळा गेम