---Advertisement---

तालिबानने केले अफगाणिस्तान क्रिकेटचे नुकसान! ‘या’ देशाने रद्द केली वनडे मालिका

On: गुरूवार, जानेवारी 12, 2023 2:41 PM
Afghanistan Team v Sri Lanka
---Advertisement---

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अफगाणिस्तान क्रिकेट संघासाठी एक निराश करणारी बातमी समोर येत आहे. मार्च महिन्यात अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार होती. मात्र, आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ही मालिका न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या अफगाणिस्तानवर राज्य करत असलेल्या तालिबानने महिलांवर घातलेले निर्बंध मागे न घेतल्याने क्रिकेट ऑस्ट्रेलिया हा निर्णय घेतल्याचे सांगितले.

https://www.instagram.com/p/CnTXSZ9B6Ry/?igshid=YmMyMTA2M2Y=

 

जवळपास दीड वर्षांपूर्वी तालिबानने पुन्हा एकदा अफगाणिस्तानवर कब्जा केला आहे. आपले राज्य येतात तेथील नागरिकांवर मोठ्या प्रमाणात निर्बंध घातले आहेत. विशेषतः महिलांना सार्वजनिक ठिकाणी जाण्यास तसेच क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्यावर त्यांनी बंदी घातली आहे. नेमकी हीच बाब क्रिकेट ऑस्ट्रेलियाला आवडली नाही. क्रिकेट ऑस्ट्रेलिया सातत्याने महिला क्रिकेट व महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न करत असते. अफगाणिस्तानमध्ये महिलांना क्रिकेट खेळू न दिल्याने ‌‌ऑस्ट्रेलियाने या आधीच सदर मालिका रद्द करण्याची धमकी दिलेली. मात्र, यानंतरही त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने त्यांनी आता हा निर्णय जाहीर केला आहे.

मार्च महिन्यात अफगाणिस्तानच्या यजमानपदात ऑस्ट्रेलिया युएई येथे ही मालिका खेळणार होता. उभय संघांमधील ही पहिलीच मालिका होती. परंतु, यासाठी आता आणखी वाट पहावी लागणार आहे. मागील वर्षी झालेल्या टी20 विश्वचषकात ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान पहिल्यांदाच आमने-सामने आले होते. यामध्ये अटीतटीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने चार धावांनी विजय मिळवला होता.

अफगाणिस्तान हा आयसीसीचा एकमेव असा पूर्ण सदस्य देश आहे, ज्यांचा महिला आंतरराष्ट्रीय संघ नाही. तसेच, 13 जानेवारीपासून दक्षिण आफ्रिकेत सुरू होत असलेल्या महिला अंडर 19 विश्वचषकातही अफगाणिस्तान संघ सहभागी नसेल.

(Cricket Australia Cancelled ODI Series Against Afghanistan Due To Taliban Restrictions)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रिहान, रिवाने बाजी मारली; धीरूभाई अंबानी शाळेला टेनिसचे सांघिक विजेतेपद
विराट विरुद्ध सचिन वादात गांगुलीची उडी! म्हणाला, ‘असेच कोणीही 45 शतके…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---