मुंबई । ऑस्ट्रेलियामधील व्हिक्टोरिया प्रांतात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. त्यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणारा बॉक्सिंग डे कसोटी सामना मेलबर्नऐवजी अॅडलेडमध्ये होऊ शकतो. सिडनी मॉर्निंग हेराल्डच्या म्हणण्यानुसार 26 ते 30 डिसेंबर दरम्यान होणार्या या कसोटी सामन्याचे आयोजन करण्याच्या शर्यतीत अॅडलेड आघाडीवर आहे. या मालिकेच्या संचालनाविषयी चर्चा करण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष अर्ल एडिंग्ज यांनी पुढील आठवड्यात राष्ट्रीय क्रिकेट समितीची तातडीची बैठक बोलविली आहे.
जर भारताविरुद्धची ही मालिका झाली नाही तर क्रिकेट ऑस्ट्रेलियाला 300 दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर्सचे नुकसान होईल. एका वरिष्ठ अधिका-याने प्रसारमाध्यमांना सांगितले की, ‘कोरोना विषाणूच्या साथीमुळे या मालिकेचे वेळापत्रक बदलावे लागेल.’ व्हिक्टोरियामध्ये आतापर्यंत 17000 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत आणि 170 लोक मरण पावले आहेत. न्यू साउथ वेल्समध्ये 4000 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत तर अॅडलेडमध्ये 457 रुग्णांपैकी 445 जण बरे झाले आहेत.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आधीच सांगितले आहे की, मालिकेच्या वेळापत्रकात बदल होऊ शकतो. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका 3 डिसेंबरपासून ब्रिस्बेनमध्ये सुरू होणार आहे. यानंतर 11 ते 15 डिसेंबर दरम्यान अॅडलेडमध्ये दिवस-रात्र कसोटी सामना खेळला जाईल. तिसरा कसोटी सामना मेलबर्न येथे 26 डिसेंबरपासून तर चौथा 3 जानेवारीपासून सिडनी येथे होईल.
महत्त्वाच्या बातम्या –
युवराज सिंग म्हणतो, गांगुली निवृत्त झाल्यावर मला संधी मिळाली, पण…
ज्याने भारताविरुद्ध दिली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून, आज पाकिस्तानने त्यालाच केले वॉटर बॉय
जॉंटी रोड्सपेक्षाही खतरनाक झेल घेते ही मांजर, सोशल मीडियावर झालीय सुपरस्टार
ट्रेंडिंग लेख –
फलंदाजांच्या कानाजवळून शिट्टीचा आवाज काढत जाणारे चेंडू टाकण्यासाठी कुप्रसिद्ध ठरलेला गोलंदाज
क्रिकेट जगतातील ५ महान खेळाडू, जे झाले होते वाॅटरबाॅय
आयपीएल २०२०: शानदार क्षेत्ररक्षणाचा नमुना सादर करु शकणारे ५ क्रिकेटपटू