---Advertisement---

टी20 विश्वचषकाची ‘टीम ऑफ द टूर्नामेंट’ जाहीर रोहित शर्माला संघात स्थान, कर्णधार मात्र दुसराच

On: शनिवार, जून 29, 2024 6:14 PM
India vs Afghanistan
---Advertisement---

सध्या सुरु असलेल्या आयसीसी टी20 विश्वचषकाचा (ICC T20 World Cup) आज (29 जून) रोजी फायनल सामना खेळला जाणार आहे. बार्बाडोसच्या मैदानावर भारत आणि दक्षिण आफ्रिका ट्राॅफीवर नाव कोरण्यासाठी भिडणार आहेत. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियानं यंदाच्या टी20 विश्वचषकाची ‘टीम ऑफ द टूर्नामेट’ संघाची घोषणा केली आहे. या संघामध्ये भारताच्या 3 खेळाडूंना स्थान मिळालं आहे. तर या संघाचा कर्णधार म्हणून राशिद खानची नियुक्ती करण्यात आली आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियानं या संघामध्ये सलामीवीर म्हणून भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ट्रॅव्हिस हेडला निवडलं आहे. हेडनं 7 सामन्यात 255 धावा ठोकल्या आहेत. तर रोहितनं 7 सामन्यात 248 धावा ठोकल्या आहेत. मधल्या फळीत त्यांनी वेस्ट इंडिजचा निकोलस पूरन, अमेरिकेचा ॲरोन जोन्स, ऑस्ट्रेलियाचा मार्कस स्टाॅयनिसला निवडलं आहे. पूरननं 7 सामन्यात 228, जोन्सनं 6 सामन्यात 162 आणि स्टाॅयनिस 7 सामन्यांमध्ये 169 धावा ठोकल्या आहेत.

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला या संघात स्थान मिळालं आहे. ज्यानं या विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत 139 धावा आणि 8 विकेट्स घेतल्या आहेत. अफगाणिस्तान संघाचा कर्णधार राशिद खानला ऑस्ट्रेलियानं कर्णधार बनवलं आहे. राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्ताननं इतिहास रचला. तर राशिदनं देखील या टी20 विश्वचषक स्पर्धेत 8 सामन्यांमध्ये 14 विकेट्स घेतल्या आहेत.

बांगलादेशचा फिरकीपटू रिशाद हुसेनला देखील या संघात संधी मिळाली आहे. त्यानं 7 सामन्यात 14 विकेट्स घेतल्या आहेत. त्यानंतर एनरिक नाॅर्टजे, जसप्रीत बुमराह आणि फजलहक फारुकीला वेगवान गोलंदाज म्हणून निवडलं आहे. नाॅर्टजे 8 सामने 13 विकेट्स, बुमराह 7 सामने 13 विकेट्स तर फजहलक फरुकीनं या टी20 विश्वचषकात 8 सामन्यांमध्ये सर्वाधिक 17 विकेट्स घेतल्या आहेत.

 

महत्त्वाच्या बातम्या-

अंतिम सामन्यात टॉस जिंकल्यानंतर आधी फलंदाजी करायची की गोलंदाजी? जाणून घ्या खेळपट्टीचा अहवाल
IND vs RSA सामना सुपर ओव्हरमध्येही टाय झाला तर ट्राॅफी कुणाची?
फायनलपूर्वीच केलं टीम इंडियाचं अभिनंदन, स्टार बाॅलीवूड अभिनेत्याची पोस्ट व्हायरल 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---