आजकाल पाकिस्तान क्रिकेटला एकामागून एक धक्का बसत आहेत. पाकिस्तानमधील सुरक्षा व्यवस्थेबाबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघांमध्ये भीतीचे असे वातावरण आहे की ते त्या देशात क्रिकेट खेळण्यास सर्व संघ स्पष्टपणे नकार देत आहेत. सर्वप्रथम, पाकिस्तानमध्ये पोहोचल्यानंतर सुरक्षेच्या भीतीने न्यूझीलंडने शेवटच्या क्षणी खेळण्यास नकार दिला. न्यूझीलंडचा पाकिस्तान दौरा रद्द झाल्यानंतर काही दिवसांनी इंग्लंडनेही पाकिस्तान दौरा रद्द केला.
इंग्लंडचे पुरुष आणि महिला संघ पुढील महिन्यात ऑक्टोबरमध्ये पाकिस्तान दौऱ्यावर मर्यादित षटकांची मालिका खेळणार होते. न्यूझीलंड आणि इंग्लंडनंतर आता ऑस्ट्रेलियाही त्यांच्या पाकिस्तान दौऱ्याबाबत द्विधा मनस्थितीत अडकला आहे.
ऑस्ट्रेलिया पुढील वर्षीच्या सुरुवातीला पाकिस्तानचा दौरा करणार असला तरी, न्यूझीलंड आणि इंग्लंडनंतर त्यांनी पाकिस्तान दौऱ्याचाही पुनर्विचार करायला सुरुवात केली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने म्हटले आहे की, ते पुढील वर्षी पाकिस्तान दौऱ्याच्या स्थितीवर लक्ष ठेवून आहे.
ऑस्ट्रेलियन संघाला पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये पाकिस्तान दौऱ्यावर संपूर्ण मालिका खेळायची आहे. जर पाकिस्तानच्या या दौऱ्यावर येण्यास ऑस्ट्रेलिया यशस्वी झाला, तर 1998 नंतर ऑस्ट्रेलियन संघाचा पाकिस्तानचा हा पहिलाच दौरा असेल.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे नवनियुक्त अध्यक्ष रमीज राजा यांना भीती वाटत होती की, ऑस्ट्रेलिया इंग्लंड आणि न्यूझीलंडच्या पावलावर पाऊल टाकू शकतो. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, ते परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या कोल हिचकॉकने एका ईमेलच्या उत्तरात म्हटले आहे की, ‘आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि अधिक माहिती मिळताच संबंधित अधिकाऱ्यांशी बोलत आहोत.’
पाकिस्तान क्रिकेटला गेल्या आठवड्यात मोठा धक्का बसला, जेव्हा न्यूझीलंडने रावलपिंडी येथे पहिल्या वनडे दरम्यान नाणेफेक करण्यापूर्वी, सुरक्षेच्या कारणास्तव दौरा रद्द करण्याची घोषणा केली. न्यूझीलंडने पीसीबीला कोणत्याही धमकीची माहिती न देता हा निर्णय घेतला. न्यूझीलंडने दौरा रद्द केल्यानंतर इंग्लंडने देखील पाकिस्तानात येण्यास नकार दिला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
पाकिस्तानसाठी न्यूझीलंडचा दौरा पडला महागात, सुरक्षा अधिकाऱ्यांनी खाल्ली २७ लाखांची बिर्याणी
अफगाणिस्तानची टी२० विश्वचषकातून होणार गच्छंती? अजब आहे कारण
DC vs SRH: दिल्लीचा एकतर्फी विजय! विलियम्सनच्या हैदराबादला ८ विकेट्सने नमवलं