क्रिकेटच्या मैदानावर आजपर्यंत आपण अशा अनेक घटना पाहिल्या आहेत, ज्यांनी अंगावर काटा आणला आहे. कधीकधी मैदानावर फलंदाजाला एखादी गोष्ट करायची नसते, पण ती त्याच्याकडून चुकून घडते. जसे की, चेंडू टाकताना हातातून निसटल्यामुळे चौकार जाणे किंवा फलंदाज हिटविकेट होणे. आताही असेच काहीसे पाहायला मिळाले आहे, ज्यात रागाच्या भरात फलंदाज हवेत बॅट फेकतो. मात्र, हेच त्याच्या सहकाऱ्यासाठी धोकादायक ठरले. आता नेटकरी कमेंट करत आहेत की, धावबाद होण्यापेक्षा वाईट काहीच नसते.
नेमकं काय घडलं?
खरं तर, ट्विटर किंवा एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका युजरने 25 ऑगस्ट रोजी एक व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडिओ कोणत्या सामन्याचा आणि कोणत्या स्पर्धेतील आहे, हे समजू शकले नाही. मात्र, हा व्हिडिओ लक्षवेधी आहे. या व्हिडिओत शॉट मारल्यानंतर फलंदाज धाव घेण्याचा प्रयत्न करतो. मात्र, त्याला धाव पूर्ण करता येत नाही आणि क्रीझवर परतावे लागते.
थेट जबड्यावर लागली बॅट
या प्रयत्नात फलंदाज आपली विकेट गमावतो. धावबाद झाल्यामुळे रागाच्या भरात फलंदाजाचे संयम तुटते आणि तो आपली बॅट जोरात फेकतो. मात्र, पुढे जे घडेल, कदाचित याचा त्याने ही विचार केला नसेल. ही बॅट फेकताच क्रीझवर दुसऱ्या बाजूला असलेल्या फलंदाजाच्या जबड्यावर जाऊन लागते. मात्र, हेही तितकेच खरे आहे की, त्याने कुणालाही नुकसान पोहोचाव, या हेतूने बॅट फेकली नव्हती. आता यादरम्यानचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
https://twitter.com/MovieNCricEdits/status/1695087895772860531?s=20
नेटकऱ्यांच्या कमेंट्स
या व्हिडिओवर नेटकरी कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत. एकाने कमेंट करत लिहिले की, “मला आश्चर्य वाटते की, त्यांच्याकडे एक टिप झेल पकडण्याचा नियम आहे की दोन टिप?” दुसऱ्या एकाने लिहिले की, “पुढं काय झालं?”
अशाप्रकारे नेटकरी कमेंट करत आहेत. हा व्हिडिओ आतापर्यंत 2 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. (cricket batsman broke his partners jaw after being run out see video)
हेही वाचा-
आगामी आशिया चषकातही भारतीय संघाला विराटकडून अपेक्षा, पाकिस्तानविरुद्ध गेल्या 5 सामन्यात घातलाय राडा
‘मी जे पाहिलंय, त्यावरून हे स्पष्ट आहे…’, विराटच्या बॅटिंगविषयी माजी कोचचे सनसनाटी वक्तव्य