आपल्या क्रिकेट क्लबमध्ये लोकांनी सहभाग घ्यावा, यासाठी नवनवीन कल्पना काढल्या जातात. त्यात फी कपात, काही बाबींवर सूट देऊन ते आपल्या क्लबची लोकप्रियता वाढवतात. त्यातच ब्रिटनमधील एका क्रिकेट क्लबने खेळाडूंची शोधाशोध करण्यासाठी एक वेगळीच युक्ती वापरली आहे आणि याची सोशल मीडियावर जोरदार चर्चादेखील सुरू आहे.
एका क्लबला खेळाडू मिळत नसल्याने त्यांनी टिंडर या ऑनलाईन ऍपचा वापर केला आहे. यामध्ये त्यांनी खेळाडूंना त्यांच्या क्लबमध्ये सामील होण्याचे आमंत्रण दिले आहे.
ब्रिटनमधील सर्रे येथे असलेल्या या ऐगलफिल्ड ग्रीन क्रिकेट क्लबने ही शक्कल लढवली आहे. या ऍपमध्ये त्या क्लबने स्वत:ला ३६ वर्षाची महिला सांगितले आहे. तर सीमारेषेवर ठेवलेला बियरने भरलेल्या ग्लासचा फोटो प्रोफाईल पिक्चर म्हणून टाकला आहे. ‘खेळाडूंची भरती करण्यासाठी ही अविश्वसनीय एक कल्पना आहे,’ असे दॅट्स सो व्हिलेज या ट्विटर पेजने कॅप्शन देत या क्लबचे टींडरवरील स्क्रिनशॉट काढून ट्विट केला आहे.
‘जॉर्ज, ३६, ऐगलफिल्ड ग्रीन क्रिकेट क्लबसाठी नवीन खेळाडूंचा शोध, ईमेल, इन्स्टा, ट्विटर यांच्या आयडीसह’, असे त्या फोटोवर लिहिले आहे.
Incredible recruitment tactic from Englefield CC, listing themselves as a 36-year-old woman on Tinder in an effort to attract new players. @EGCC1, via @DanTHFC1 pic.twitter.com/NujgP2eMUC
— That’s So Village (@ThatsSoVillage) May 30, 2022
या क्लबचे टिंडर प्रोफाईल काहींनी ट्विटरवर शेयर केले असून त्याला काहींनी गमतीदार रिप्लाय दिले आहेत.
Brilliant to see, I wonder if the club president was behind the idea?
— Toby Bromige (@BromigeToby) May 30, 2022
Excellent.
But they may need to work on other parts of their media offering.. pic.twitter.com/AZdA4cbqmh
— Sir Alan B'Stard MP PhD KPMG (@BStardAlan) June 1, 2022
क्लबने देखील हे ट्विट्स रीट्विट करत, त्यांना उत्तरे देत, “चला ही कल्पना चालते की नाही ते कळेलच आणि कोणत्या भागातील खेळाडू यांना उत्तरे देतात का ते पण पाहुया,”असे ट्विट केले आहे.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आधी फास्ट बॉलर, मग स्पिनर आणि आता बॅटर म्हणून नाव कमावलेला आरसीबीचा रजत पाटीदार
जसप्रीत बुमराहच्या पत्नीमुळे रोहित शर्माचे चाहते नाराज? धक्कादायक कारण आले समोर
पदार्पणातील पहिल्याच षटकात केन विलियम्सनची विकेट काढणारा मॅथ्यू पॉट्स नक्की आहे तरी कोण?