सध्या क्रिकेटविश्वात एकच नावाची चर्चा आहे. तो खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसुन भारतीय क्रिकेट संघाचा युवा सलामीवीर शुभमन गिल आहे. त्याने त्याच्या खेळीने सर्वांचेच मन जिंकले. भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडे मालिका आणि T 20 मालिकेमध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. या कामगिरीमुळे भारताचे माजी खेळाडू आणि सध्या समालोचकाची भूमिका पार पाडणारे आकाश चोप्रा यांनी खास प्रतिक्रिया दिली. “शुबमन गिल विराट कोहली सारखा असू शकतो की नाही हे फक्त येणारी वेळच सांगेल,” असे वक्तव्य आकाश चोप्राने केले.
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारतीय सलामीवीर (India vs New Zealand) शुबमन गिल याने 149 चेंडूत 208 धावा केल्या. या कामगिरीमुळे शुबमन गिलला (Shubman Gill) सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात त्याने 53 चेंडूत 40 धावा केल्या. तसेच तिसऱ्या वनडे सामन्यात गिलने 78 चेंडूत 112 धावांची खेळी केली. मालिकेतील अप्रतिम प्रदर्शनसाठी गिलला मालिकावीर म्हणून निडण्यात आले. गिलने न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिकेत देखील जबरदस्त प्रदर्शन केले. तिसऱ्या टी-20 सामन्यात त्याने शतक झळकावले. त्याने अवघ्या 63 चेंडूत 12 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने नाबाद 126 धावांची खेळी केली.
अशा प्रकारे गिल क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये शतक झळकावणाऱ्या निवडक भारतीय फलंदाजांच्या यादीत सामील झाला. त्याची उत्कृष्ट कामगिरी पाहून अनेक तज्ज्ञांनी त्याला भारतीय क्रिकेटचा पुढचा सुपरस्टार म्हटले आहे. अनेकजण गिलची तुलना संघातील काही दिग्गज खेळाडूंशीही करत असतात. भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज आकाश चोप्रा (Aakash Chopra) याने देखील गिलचे कौतुक केले. चोप्रा म्हणाला की, “लोक शुभमन गिलची तुलना विराट कोहलीशी (virat kohli) करत आहेत पण गिल तितकाच यशस्वी होईल की नाही हे येणारा काळच सांगेल.”
आकाश चोप्रा यांनी त्यांच्या यूट्यूब बोलताना याविषयी प्रतिक्रिया दिली. “विराट कोहलीने जे काम केले आहे ते शुभमन गिल करू शकेल की नाही? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. याचे उत्तर येणारा काळ देईल. जर दोन्ही खेळाडूंमधील सारखेपणाबाबत बोलायचे झाले तर एक गोष्ट समोर येते की, दोन्ही खेळाडू तांत्रिकदृष्ट्या खूप सक्षम आहेत. हे दोघेही अगदी तगड्या फलंदाजांसारखे दिसतात. विराट कोहलीने दशकभर राज्य केले आणि त्याने सातत्यपूर्ण फलंदाजी केली. आधुनिक क्रिकेटमध्ये त्याने सुपरमॅनचे काम केले आहे.”
आकाश चोप्राने (Cricket commentator Aakash Chopra) असेही म्हटले आहे की, “याआधी प्रत्येकजण शुभमन गिलला भारतीय क्रिकेटचे भविष्य म्हणत होता, परंतु त्याच्या सातत्यपूर्ण जबरदस्त कामगिरीने त्याने दाखवून दिले आहे की आता तो भारतीय क्रिकेटचा वर्तमान आहे.” (Cricket commentator Aakash Chopra compare between virat kohli and Young Indian Cricketer Shubman Gill)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
राष्ट्रीय संघापेक्षा फ्रँचायझीला अधिक प्राधान्य देत आहेत इंग्लिश खेळाडू, कर्णधार बटलर नाराज
ब्रेकिंग! पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतींना देवाज्ञा, दुबईच्या रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास