आयपीएलचा तेरावा हंगाम 2020 साली यूएईत पार पडला. ही स्पर्धा सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत पार पडली होती. या स्पर्धेदरम्यान दिल्लीतील एका नर्सने अशासकीय पद्धतीने भारतीय खेळाडूंकडून अंतर्गत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. इंडियन एक्स्प्रेस मध्ये छापले गेलेल्या एका बातमीनुसार दिल्लीच्या एका नर्सने 30 सप्टेंबरला सोशल मीडियाच्या माध्यामातून एका भारतीय खेळाडू सोबत संपर्क साधला होता.
ही घटना स्पर्धेच्या मधल्या काळातील आहे. या नर्सने सामन्याच्या माहिती बरोबर प्लेईंग इलेव्हन बद्दल विचारले होते. कारण की या सामन्यावर त्या नर्सला सट्टा लावायचा होता. यावर त्या खेळाडूने त्या प्रकारची माहिती बद्दल विचारणा केल्यामुळे याबद्दल पोलिसांना कळवण्याची धमकी दिली. ही माहिती भारतीय क्रिकेट बोर्डच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाचे मुख्य अधिकारी अजित सिंह यांनी इंडियन एक्स्प्रेस सोबत बोलताना खुलासा केला की, या प्रकरणाचा तपास केला गेला होता. परंतु हे आता बंद केले आहे. कारण या प्रकरणात काहीही आढळून आले नाही.
अजित सिंह म्हणाले, “आयपीएल दरम्यान खेळाडूने आम्हाला कळवले होते. आम्ही याचा शोध घेत होतो आणि आता हे प्रकरण बंद केले आहे. खेळाडूशी संपर्क साधणारी व्यक्ति अव्यावसायिक होती (त्याचा कोणत्याही सट्टेबाज किंवा समुहाशी संबंध नव्हता). या प्रकरणात कोणती ही माहिती नव्हती.”
अजित सिंह पुढे म्हणाले, “आम्ही या प्रकरणाचा चांगल्या पद्धतीने तपास केला. आरोपी खेळाडूला ओळखत होता. जेव्हा खेळाडूने आम्हाला याबद्दल कळवले तेव्हा आम्ही सर्व माहिती गोळा केली. त्यानंतर आम्ही नर्सला चौकशी साठी बोलावले. परंतु त्यामधून कोणतेही धागेदोरे सापडले नाही आणि प्रकरण बंद झाले.”
या अहवालात असे समजले की, तो खेळाडू आणि नर्स जवळपास तीन वर्षापूर्वी ऑनलाईन भेटले होते. नर्सने आपण चाहता असल्याचा दावा केला होता आणि दिल्लीच्या एका हॉस्पिटल मध्ये डॉक्टर असल्याचे सांगितले होते. हा खेळाडू नुकताच संपर्कात आला होता. त्या खेळाडूने या नर्सकडून कोरोना संबधित सावधगिरी बाळगण्यासाठी सल्ला मागितला होता. त्याचबरोबर हा खेळाडू म्हणाला, त्या नर्सला तो व्यक्तिगत कधीच भेटला नाही आणि फक्त सोशल मीडियावर बोलणे होत होते.
बीसीसीआयच्या एका सूत्राने इंडियन एक्स्प्रेस सांगितले की, “खेळाडू म्हणाला की, तो या नर्सला ओळखत नाही आणि ती कुठे राहते व कुठे काम करते हे पण माहित नाही. ऑनलाइन बोलताना नर्स म्हणाली होती की, तिला सट्टा लावायचा आहे. यामुळे तिला सामन्या बद्दल आणि प्लेईंग इलेव्हन बाबत माहिती हवी होती.”
महत्त्वाच्या बातम्या-
कसोटीत शुन्यावर बाद होणं महापाप! ‘या’ तीन आशियायी फलंदाजांनी तर सलग तीन डावात केलंय हे काम
निकाल तर शंभर टक्के लागणार, परंतू पाहा काय आहे श्रीलंका-दक्षिण आफ्रिका कसोटी सामन्याची सद्यस्थिती
चालू कसोटी सामन्याच्या शेजारी चिमुकल्यांनी मांडला क्रिकेटचा डाव, फोटो सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ