मंबुई क्रिकेटमधील वजनदार नाव असलेले दिनेश लाड,रोहित शर्माचे प्रशिक्षक म्हणून प्रसिद्ध आहेत.
दिनेश लाड रोहित शर्मा आणि शार्दूल ठाकूर यांच्यानंतर भारतीय संघासाठी नवा क्रिकेटपटू घडवत आहेत.
हा क्रिकेटपटू म्हणजे खुद्द दिनेश लाड यांचा मुलगा सिद्धेश लाड आहे.
सिद्धेश लाडची भारतीय अ संघात निवड झाली आहे. भारत अ, भारत ब, ऑस्ट्रेलिया अ आणि दक्षिण आफ्रिका अ यांच्यात होणाऱ्या चौरंगी मालिकेसाठी ही निवड झाली आहे.
सिद्धेशच्या या निवडीनंतर त्याचे प्रशिक्षक आणि वडिल दिनेश लाड यांनी त्याच्या निवडीचा आनंद व्यक्त केला. तसेच त्यांचा विद्यार्थी रोहित शर्मा आणि पुत्र सिद्धेश यांच्याविषयी मोठे वक्तव्य केले आहे.
“मला सर्वजन रोहित आणि शार्दूलचा प्रशिक्षक म्हणून ओळखतात याचा मला अभिमान आहे. पण जर मला आता लोकांनी सिद्धेशचा प्रशिक्षक म्हणून ओळखले तर तो मझ्यासाठी सर्वोच्च सन्मान असेल.” असे दिनेश लाड म्हणाले.
“मला आनंद आहे की, सिद्धेश रोहित कर्णधार असलेल्या मुंबई संघाचा भाग आहे. सिद्धेशला जरी मुंबईकडून अंतिम अकरा जणांच्या संघात स्थान मिळाले नसले तरी, त्याने नेटमध्ये रोहितची फलंदजी पाहून त्याच्यात कमालीची सुधारणा केली आहे.” दिनेश लाड रोहित आणि सिद्धेशबाबत बोलताना म्हणाले.
तसेच दिनेश लाड यांनी सिद्धेशची रोहित बरोबर तुलना केली.
“मला वाटते की तंत्रात सिद्धेशची फलंदाजीची शैली रोहित सारखीच आहे. कव्हर ड्राइव्ह हा माझा आणि रोहितचा पेटेंट शॉट आहे. मला अलिकडे सिद्धेशची फलंदाजी पाहून असे वाटत आहे की, सिद्धेशही आता आमच्या जवळ आला आहे.” या शब्दात दिनेश लाड यांनी सिद्धेश आणि रोहित शर्माची तुलना केली.
सिद्धेश लाडने २०१७-१८ च्या रणजी मोसमात ६५२ तर विजय हजारे ट्रॉफीमध्ये ३७२ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-सेहवाग, गंभीर आणि आकाश चोप्रा पुन्हा एकत्र, खेळणार नवीन इनिंग
-स्टीव्ह स्मिथ खेळणार आयपीएल सारख्याच मोठ्या लीगमध्ये!